• Sat. Sep 21st, 2024
चिपळूण येथील राजकीय राड्यानंतर ४०० जणांवर गुन्हा दाखल, ठाकरे गटाच्या सात पदाधिकाऱ्यांना अटक

रत्नागिरी : कोकणात चिपळूण येथे लोकसभा निवडणुकांपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. आमदार भास्कर जाधव व निलेश राणे यांचे कार्यकर्ते भिडल्यानंतर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुरांचा वापर करावा लागला होता. आता या सगळ्यानंतर चिपळूण पोलीस ॲक्शन मोडवर आले आहेत. जवळपास ३५० ते ४०० जाणार होती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी उद्धव बाळासाहेब ठाकरे कटाच्या सात पदाधिकाऱ्यांना चिपळूण पोलिसांनी काल शनिवारी अटक केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील कार्यालयाबाहेर व घराबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

प्रशांत वामन चव्हाण पोलीस हवालदार यांनी या प्रकरणी फिर्याद नोंदवली आहे. चिपळूण येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शहनवाज शिरळकर, फैयाज शिरळकर, हेमंत मोरे यांना अटक अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी हा सगळा प्रकार घडण्यापूर्वीच पोलिसांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी भाजपच्या दोन प्राधिकार्‍यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. चिपळूण भाजपाचे तालुका प्रमुख वसंत ताम्हणकर व शहर प्रमुख परिमल भोसले या भाजपच्या पदाधिकाऱ्या या नोटिसा देण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
विलासरावांच्या आठवणीत रितेशला रडू कोसळलं, हुंदके देत देत भाषण, अमित देशमुखांनी सावरलं
३५० ते ४०० जणांच्या जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १० ते १२ कलमे पोलिसांनी लावली आहेत आयपीसी १४३, १४५, १४७, १४९, १६०, ३३७, ३५३, ५०४, ५०६ या कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सरकारी कामात अडथळा, दोन गटात हाणामारी, शिवीगाळ आणि शारीरिक दुखापत या संदर्भात हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनेनंतर या सगळ्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी चिपळूण पोलिसांकडून सुरू असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची शोध मोहीम सुरू असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती चिपळूण पोलिसांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed