• Mon. Nov 25th, 2024

    आमदार रवींद्र धंगेकर यांच्या साधेपणाचं दर्शन,लोणावळ्यातही धंगेकर पॅटर्न, कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा

    आमदार रवींद्र धंगेकर यांच्या साधेपणाचं दर्शन,लोणावळ्यातही धंगेकर पॅटर्न, कार्यकर्त्यांसोबत चाय पे चर्चा

    लोणावळा,पुणे : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्यावतीने लोणावळा येथे दोन दिवसीय चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, यात चर्चा झाली ती काँग्रेसचे पुण्याचे कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांची. शिबिर संपल्यानंतर उपस्थित कार्यकर्त्यांना रविंद्र धंगेकर यांना चक्क चहा वाटपाचे काम केले.

    आमदार म्हणून न मिरवता एक सामान्य कार्यकर्ता कसा असतो हे धंगेकरांनी दाखवून दिलं आहे. काँग्रेसच्या शिबिराची सांगता होताच सगळ्या नेते मंडळी चार चाकी वाहनांमधून प्रवास करत लोणावळ्यातून बाहेर पडली. मात्र, आमदार रवींद्र धंगेकर हे एका चहाच्या टपरीवर पोहोचले आणि त्यांनी आपल्या आमदारकीचा रुबाब न दाखवता स्वतः कार्यकर्त्यांना चहा देत चाय पे चर्चा केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारायल झाला आहे. त्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
    काँग्रेस रक्तात, मरेपर्यंत पक्ष सोडणार नाही, भाजपला संपवणार, प्रणिती शिंदे आक्रमक
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर आयोजित करण्यात आले होते. या चिंतन शिबिरात राज्यातील सर्व आमदार, खासदार उपस्थित झाले होते. या शिबिरात लोकसभा निवडणुकीची रणनीती देखील ठरवण्यात आली. मात्र पुण्यातील काँग्रसचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी काल जे काही केले. ते पाहून रवींद्र दंगेकर यांच्या कृतीने सर्वांचीच मने जिंकली. सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणे काय असते. त्यांच्यासोबत एकत्र राहून चर्चा करणे. काय असते हे धंगेकर यांनी यातून दाखवून दिले.
    कसबा पेठेची आमदारकी मिळवली, आता खासदारकीचे वेध? ‘धंगेकर पॅटर्न’ पोस्टर सोशल मीडियावर चर्चेत
    रवींद्र धंगेकर हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तसे सोशल मीडियावर बॅनर देखील व्हायरल झाले होते. मात्र कालच्या धंगेकर यांच्या कृतीने सर्वांचीच मने जिंकली आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *