• Sat. Sep 21st, 2024
दोन वेळा संधी हुकली, यावेळी टायमिंग साधणार, पुणे लोकसभेसाठी भाजपचं धक्कातंत्र?

पुणे : अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी नशीब आजमावायला अनेक जण गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. आपापल्या परीने आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण कसोशीने करत आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची रांगच लागली आहे. भाजपमध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, ईशान्य भारतात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, छगन भुजबळ यांच्याशी दोन हात करणारे शिवाजी मानकर, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही नाव पुणे लोकसभा मतदारसंघासाठी चर्चिले गेले.

तर दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडूनही इच्छुकांच्या २० जणांची यादी जाहीर केली होती. या सगळ्यात आघाडीवर आहेत ते मुरलीधर मोहोळ, जगदीश मुळीक आणि सुनील देवधर. पण भाजपची रणनीती नेहमीच धक्कातंत्राची राहिली आहे. या लोकसभा निवडणुकीतही भाजपने धक्कातंत्र वापरल्यास मोहोळ, मुळीक, देवधर यांच्या व्यतिरिक्त वेगळेच नाव भारतीय जनता पार्टीकडून पुणे लोकसभेसाठी दिले जाऊ शकते. आता यात भर पडले आहे, ती पुण्यातल्या एका बड्या उद्योगपतीची.
Praful Patel : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची उमेदवारी

सर्वच राजकीय पक्षांमध्ये उठबस असलेल्या, महाराष्ट्राच्या राजकारणातील बडे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे, पण संघाशी संबंधित असलेल्या या बड्या उद्योजकाला पुणे लोकसभेसाठी भाजपकडून तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. एकेकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या व सध्या देशाचे संरक्षण मंत्री असलेल्या राजनाथ सिंह यांच्या गोटातील व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य असलेले नाव म्हणजे अनिरुद्ध देशपांडे. पुण्यातील हे बडे प्रस्थ. अनेक राजकीय पुढार्‍यांना वेळोवेळी मदत करणाऱ्या अनिरुद्ध देशपांडे यांच्याकडे पुण्याच्या विकासाचे खास मॉडेल आहे.

काही वर्षांपूर्वी अनिरुद्ध देशपांडे यांनी पुण्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव सादर केला होता. पुण्यातील प्रसिद्ध पु. ल. देशपांडे उद्यान निर्माण करण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. असा हा दूरदृष्टी असलेला, पुण्याच्या विकासासाठी धोरणात्मक निर्णय घेऊ शकणारा नेता पुण्याला मिळाला, तर पुण्याचे भविष्य उज्वल होऊ शकते, असे त्यांचे समर्थक म्हणतात.

अशोक चव्हाणांच्या नगरमधील खंद्या समर्थकाचाही काँग्रेसचा राजीनामा, भाजपत एन्ट्री करणार?

२०१४ ला मिळणार होती लोकसभेची उमेदवारी

दरम्यान, २०१४ मध्ये तत्कालीन भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी अनिरुद्ध देशपांडे यांच्या नावाला संमती दर्शवली होती व त्यांनाच पुणे लोकसभेचे तिकीट द्यायचे होते. मात्र महाराष्ट्रातील तेव्हाच्या भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी हट्टाने अनिल शिरोळे यांना भाजपकडून उमेदवारी द्यायला लावली आणि अनिरुद्ध देशपांडे यांचे खासदार होण्याचे स्वप्न अपुरे राहिले. पुढे २०१९ ला गिरीश बापट यांनी पुणे लोकसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे पुन्हा एकदा अनिरुद्ध देशपांडे यांना लोकसभा निवडणुकीत नशीब अजमावण्यासाठी संधीने हुलकावणी दिली.
खिशातून नोटांचं बंडल काढलं, २ नोटा बावनकुळेंना दिल्या, अशोक चव्हाण यांनी भाजपत प्रवेश करताना किती पैसे दिले?

आगामी काळात भाजपने देशपांडे यांना उमेदवारी दिल्यास संभाव्य जातीय समीकरणे बाजूला पडतील व विकासासाठी काम करणारा एक चेहरा देऊन भाजप वेगळेपण सिद्ध करेल अशी प्रतिमा देशपांडे करत आहेत किंबहुना त्यांचे समर्थकही तसे सांगत आहेत. इच्छुकांची गर्दी तर फार मोठी आहे. पण यात बाजी कोण मारणार हे आत्ता सांगणे अवघड आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed