तावडे यांनी जागतिक पुस्तक मेळाव्यात पुणे पुस्तक महोत्सवाच्या दालनाला भेट दिली. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची नावे जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
तावडे म्हणाले की, राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली की, काही ठराविक उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा सुरू होते. पक्षाने यंदाच मला उत्तर मुंबईची लोकसभेची जागा लढवण्याबाबत सांगितले होते. मात्र, खासदार झाल्यानंतर जबाबदारी वाढते आणि संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने कमी वेळ मिळतो. सध्या पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने अधिक वेळ द्यायचा आहे. पुढील वर्षी बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्यानंतर, खासदारकीचा विचार करू, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
भारतीय जनता पक्षाने सर्व विचार करून, राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहे. या उमेदवारीमध्ये समतोल राखला असल्याची प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे.