• Mon. Nov 25th, 2024

    कृषी पर्यटनात उपाशी ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, कृषी अधिकारी म्हणाले शेतकरी बिअर बारमध्ये….

    कृषी पर्यटनात उपाशी ठेवल्याचा शेतकऱ्यांचा आरोप, कृषी अधिकारी म्हणाले शेतकरी बिअर बारमध्ये….

    चंद्रपूर: नुकताच चंद्रपुरामध्ये कृषी महोत्सव पार पडला. या महोत्सवातून शेतकऱ्यांच्या पदरी फार काही पडले असा कांगावा जिल्हा प्रशासन करीत आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या प्रति प्रशासन टोकाचे उदासीन असल्याचं शेतकऱ्यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओतून समोर आले आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने शेती करावी. विविध पीक पध्दतीचा अभ्यास करून आर्थिक परिस्थिती सुधारावी या उदात्त हेतूने कृषी विभागाने जळगाव येथे अभ्यास दौरा आयोजित केला.

    या अभ्यासदौऱ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. जिल्हातील कोरपना तालुक्यातील शेतकरी यात सहभागी झालेत. मात्र या अभ्यास दौऱ्यात पहिल्याच दिवशी वाईट अनुभव आला. दिवसभर शेतकऱ्यांना जेवण तर सोडा साधा नाश्ताही दिला गेला नाही. उपाशीपोटी शेतकऱ्यांनी दिवस घालवला. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी या प्रकाराचा व्हिडीओ केला अन् समाज माध्यमात व्हायरल केला आहे.

    रिलायन्स गुजराती कंपनी, मग महाराष्ट्रात काय काम? अँटिलिया गुंडाळून गुजरातला जा, मनसेचा संताप
    दरम्यान याबाबत चंद्रपूर जिल्हा कृषी अधिकारी तोटावार यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते म्हणाले, जेवणाची व्यवस्था केली होती. मात्र काही शेतकरी बिअर बार मध्ये बसले.जेवणासाठी ते उशिराने आले. त्यामुळं त्यांना जेवण मिळालं नाही. कृषी अधिकारी तोटावार यांच्या या विधानाचे शेतकऱ्यांनी मात्र खंडण केलं आहे.

    दुसऱ्यांच्या शेतात राबणाऱ्या शेतमजूरानं स्वबळावर उजाड माळरानावर फुलवली बाग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed