रत्नागिरी: लहान मुलांवर बाहेर खेळत असतानाही लक्ष ठेवावे लागते. लहान मुलांकडून अनावधानाने खातापिताना घडलेली एखादी चूकही थेट जीवावरती बेतू शकते. असाच काहीसा प्रकार रत्नागिरी शहरात घडला असून अचानक उलट्या होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल केलेल्या चार वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रीया जगन्नाथ कुमार असं य चार वर्षांच्या चिमुकलीचे नाव आहे. मात्र, हा मृत्यू अद्याप नेमका कोणत्या कारणामुळे झाला आहे समजू शकलेले नाही.
रत्नागिरी शहरातील कुवारबाव परिसराजवळ शांतीनगर रसाळवाडी येथे दोन सख्ख्या बहिणी अंगणात खेळत होत्या. यातील एक चार वर्षांची रिया अचानक घरात आली आणि तिने घरी येऊन उलट्या केल्या. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. यावेळी तिची आई कपडे धुत होती, तिला बघून घरचे घाबरून गेले. यावेळी शेजारी राहणारे सुयोग रसाळ हे या कुटुंबाच्या मदतीला धावले. त्यांच्या खाजगी वाहनाने तात्काळ तिला रत्नागिरी जिल्हा सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तिची प्रकृती गंभीर स्वरूपात अत्यवस्थ झाल्याने तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी तिच्यावरती उपचार सुरू असतानाच तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ३१ डिसेंबर रोजी रविवारी सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान तिचा मृत्यू झाला. रत्नागिरी रसाळवाडी येथील शांतीनगर परिसरात हे कुटुंब प्रकाश झोरे यांचेकडे भाड्याने राहते. या चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मात्र, या चिमुकलीच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. शवविच्छेदन अहवाल डॉक्टरांनी राखून ठेवला असून व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणाची नोंद रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश तटकरी करत आहेत.
Read Latest Maharashtra News And Marathi News