• Sat. Sep 21st, 2024
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडलं, कारण काय?

जालना: रिक्त शिक्षकांच्या जागा भरण्यात याव्या, शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून शिक्षकांना कार्यालयीन कामापासून दूर ठेवावे, मूळ शाळेवर अध्यापणाचे कार्य करू द्यावे, अशा मागण्यांची अनेकदा निवेदने प्रशासनाकडे देण्यात आली आहे. पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आंदोलने देखील केली. परंतु अद्यापही दखल न घेतल्याने पालकांच्या वतीने नूतन वर्षांच्या पहिल्या दिवशीच सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरो आंदोलन करण्यात आलं आहे.
न्यू इयर सेलिब्रेशननंतर घरी परताना नियतीनं डाव साधला, गाडीची झाडाला धडक, युवतीचा मृत्यू तर…
भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे. जिल्ह्यात ६०० हून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त असताना कार्यालयीन कामासाठी शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याचा गुणवत्तेवर देखील गंभीर परिणाम होत आहे, तरी देखील जिल्हा प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. जिल्ह्यात शिक्षकांचे ६०० हून अधिक पदे रिक्त असताना गट शिक्षणाधिकारी कार्यालयात लिपिक, शालार्थ समन्वयक, गट समन्वयक या पदावर शिक्षकांचीच नेमणूक करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान मिळत नसल्याने पटसंख्या कमी झाली आहे.

नवीन वर्षाच्या पहाटे कृषीमंत्री धनंजय मुंडेंकडून प्रभू वैद्यनाथाच्या चरणी रुद्राभिषेक

विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक द्यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरली असून जिल्हाधिकाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना शिकवावे, जेणेकरून मुलांचे नुकसान होणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. जिल्हाधिकारी प्रवेश द्वाराजवळ येताच विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या दालनात बोलवून घेत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आणि अडचणी समजाऊन घेतल्या आहेत. पण यासाठी विद्यार्थ्यांनाच जिल्हाधिकारी कार्यालयात शाळा भरवावी लागल्याने हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed