• Mon. Nov 25th, 2024
    मविआचं लोकसभेचं जागावाटप कसं होणार? वंचितची फॉर्म्युला सांगत मोठी मागणी, मार्ग निघणार…

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: लोकसभेच्या आगामी निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करायचे असेल तर जागा वाटपाचा घोळ न घालता महाविकास आघाडीचे घटकपक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) , शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी यांना प्रत्येकी बारा जागा दिल्या जाव्यात अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी केली आहे. या बद्दल येत्या दोन आठवड्यात निर्णय घेतला जावा असे त्या म्हणाल्या.

    वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची बैठक रेखा ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी छत्रपती संभाजीनगर शहरात झाली. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या ,आगामी लोकसभा निवडणूकीसाठीच्या जागा वाटपाचा निर्णय लवकर घेतला जावा अशी आमची मागणी आहे. वंचित बहुजन आघाडीला बारा जागा मिळाल्या पाहिजेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली आहे, त्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे. स्वबळावर कोणत्याही पक्षाची सत्ता येऊ शकत नाही.
    मविआ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान पेटवणार,जुन्नर ते पुणे ‘शेतकरी आक्रोश मोर्चा, शरद पवारांच्या उपस्थितीत सांगता
    २०१९ च्या निवडमूकीनंतर ‘वंचित’ ची ताकद वाढली आहे, मतांची टक्केवारी देखील वाढली आहे. २०२४ च्या निवडणूकीत भारतीय जनता पक्षाला पराभूत करणे हा आमचा अजेंडा आहे. त्यामुळे कुणीही अतिआत्मविश्वास ठेऊनये. महाविकास आघाडीमधील चारही प्रमुख पक्षांना समसमान म्हणजे प्रत्येकी बारा जागांचे वाटप करण्यात यावे, या बद्दल दोन आठवड्यात निर्णय घेण्यात यावा असे ठाकूर म्हणाल्या.
    एसटी बँकेच्या संचालकांचा राजीनामा ही निव्वळ अफवा, संतोष शिंदेंचा गुणरत्न सदावर्तेंवर हल्लाबोल, म्हणाले…
    विधानसभा निवडणूकीसाठी जागा वाटपाचे प्रमाण कमी – जास्त होऊ शकते, पण लोकसभा निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडी बारा जागा लढवण्यावर ठाम आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन चारही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवणे गरजेचे आहे, त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय लवकर घेतला जावा असे मत ठाकूर यांनी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे, फारुक अहेमद, प्रियदर्शी तेलंग उपस्थित होते.

    दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या या घोषणेनंतर महाविकास आघाडी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
    PM मोदींचं एक विधान, वरिष्ठ भाजप नेत्यांची धाकधूक वाढली, कुणाची तिकीटे कापणार, केंद्रात कुणाला संधी? सगळं सांगितलं!Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *