किनवट तालुक्यातील वाघदरी हे २५० लोकांची वस्तीच गाव आहे. तेलगंणा सीमेवर लागून असलेल्या महाराष्ट्राच्या हद्दीतील हे गाव आहे. गावातील आजू बाजूला जंगल आहे. प्रांतवार रचनेनंतर हे गाव आंध्रप्रदेश राज्यातून महाराष्ट्रात आले. पण हे गाव आज ही महाराष्ट्राच्या नकाशावर आले नाही. कुठल्याच शासकीय योजनेचा या गावातील नागरिकांना मिळत नाही. सात किलोमीटर पायपीट करुन आणि जीव मुठीत घेऊन गावकऱ्यांना जंगलातून प्रवास करावा लागतो. रस्त्याअभावी गावापर्यंत कोणतेच वाहन गावात जात नसल्याने अनेक अडचणीचा सामना गावाकऱ्यांना करावा लागत आहे.
या गावकऱ्यांकडे जवळपास साडे चार हजार हेक्टर शेतजमीन आहे, पण महसूली नोंदच नसल्याने कोणाकडे ही जमिनीचा सात बारा नाही. सातबारा नसल्याने पीकविमा, अनुदान अशा कुठल्याही योजनेचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळत नाही. जात प्रमाणपत्र आणि वन हक्क जमीन पट्टे नाहीत. गावकऱ्याकडे केवळ मतदान कार्ड , रेशन कार्ड , आधार कार्ड आहे त्यानुसार हे गावकरी महाराष्ट्रतील असले तरी गावाची महसुली नोंद नसल्याने त्याचं गाव मात्र नकाशावर नाही. गावाची महसुली नोंद घेण्याची मागणी अनेक वर्षापासून गावकरी करत आहेत.पण प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही. मागील कित्येक वर्षा पासून वाघदरी गाव महाराष्ट्रात असून ही याची नकाशावर नोंदच नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे.
सहायक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली गावाला भेट
वाघदरी हे गाव पूर्वी तेलगंणा राज्यात होतं . १९९४ – ९५ साली तेलगंणा राज्यातून महाराष्ट्रात या गावाचा समावेश झाला. या गावात २५० लोकांची वस्ती आहे.पण, अद्याप पर्यंत गावाची महसूल नोंद झाली नाही. तब्बल २८ वर्षा नंतर गावाच्या महसूल नोंदीसाठी प्रशासनाने दखल घेतली आहे. किनवटचे सहायक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वाघदरी गावाला भेट दिली. दुचाकीवर प्रवास करुन सहायक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करुण गावकऱ्यांशी चर्चा देखील केली. लवकरच मोजणी करुण गावाची महसूल नोंद केली जाणार आहे, त्यानंतर त्यांना सातबारा आणि वन पट्टा दिलं जाणार असल्याचे सहायक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News