• Tue. Nov 26th, 2024
    महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री ठरले? मंत्रिपदासाठी संभाव्य ३५ नावं समोर, वाचा संपूर्ण यादी

    Maharashtra Cabinet Minister List : मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झालं असून सध्या काही नावांची चर्चा आहे, मात्र त्यावर कुठलेही अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    अमुलकुमार जैन, मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाल्यानंतर नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत दाखल होणार आहेत. यावेळी सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, आता देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याशिवाय मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरु झालं असून सध्या काही नावांची चर्चा आहे, मात्र त्यावर कुठलेही अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.

    फडणवीसांच्या नावाला अग्रक्रम?

    देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी कार्यकर्त्यांची देखील इच्छा आहे. याशिवाय अनेक आमदारांनीही फडणवीसांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे दिल्ली दरबारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करुन फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जाईल, असं सांगितलं जात आहे.

    दरम्यान, महायुतीचे नेते दिल्लीवारी करणार असल्याने नव्या सरकारचा शपथविधी सोहळा लांबणीवर पडताना दिसत आहे. नव्या फॉर्म्युलानुसार एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री सरकारमध्ये असतील. नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समसमान मंत्रिपदं देण्यात येतील, अशी माहिती समोर येत आहे.
    Uddhav Thackeray : तुमचे आमदार आमच्या संपर्कात, शिंदे गटाचे दावे, ठाकरेंची तातडीची पावलं, २० जणांना ‘मातोश्री’वर बोलवून मोठा निर्णय

    भाजपमधून कुणाची नावं चर्चेत?

    राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणा जगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड अशा ११ जणांची नावं सध्या समोर आली आहेत.

    शिवसेनेकडून कुणाची चर्चा?

    शिवसेना शिंदे गटातील संभाव्य मंत्र्यांची देखील समोर आली आहे. यामध्ये एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे या ११ जणांचा समावेश आहे.
    Eknath Shinde : पुन्हा आपलं सरकार स्थापन होतंय, मात्र… मध्यरात्री १२ वाजून ५३ मिनिटांनी एकनाथ शिंदेंचं ट्वीट

    राष्ट्रवादीतून कोण चर्चेत?

    अजित पवार गटातील संभाव्य मंत्र्यांचीही यादी आली असून यात अजिते पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे या १३ जणांचा समावेश आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed