धुळे-सोलापूर महामार्गावरील बोरविहीर टोलनाक्यावर स्थानिक युवकांनी धिंगाणा घातला. गावातील मुलांना कामावर का घेत नाही यावरून वाद निर्माण झाला. बारा जणांवर गुन्हे दाखल झाले असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. या घटनेमुळे टोलनाक्यावर तणाव निर्माण झाला.
गावातील मुले टोल नाक्यावर कामाला का लावून घेत नाही, या कारणावरून दहा ते बारा जणांनी टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. फक्त हेच नाही तर यापुढे टोलनाका कसा चालवता हे पाहतो, असेही त्यांनी म्हटले. काहीही झाले तरीही आम्ही टोल नाका चालू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला.
शिक्षिकेचा लग्नास नकार, एकतर्फी प्रेमातून तरुणाचं टोकाचं पाऊल, शाळेत घुसून काटा काढलाया घटनेनंतर पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या सर्व गोंधळ घालणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. सीसीटीव्हीमध्ये धिंगाना घालणाऱ्या युवकांचे चेहरे देखील स्पष्ट दिसत आहेत. टोल नाक्यावरील वाहनांना टोल न घेताच सोडताना हे युवक सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत.
काही जणांनी चेहऱ्याला रूमाल बांधल्याचे देखील सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. या घटनेनंतर टोल नाक्यावर काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाल्याचे बघायला मिळाले. अनेक ठिकाणी बऱ्याचदा काहीही झाले की, गावातील लोक हे टोल नाक्यांना टार्गेट करताना दिसतात. गावकरी आणि टोल नाका चालक यांच्यामधील वाद हा काही नवा नाहीये. त्यामध्येच आता हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.