Pune Crime : स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवरील पूर्ण जळालेली हाडे आणि तेथून ४० फूट अंतरावर रक्त सांडलेल्याचे दिसून आले. त्यामुळेहा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला.
कोणतेही धागेदोरे हाती नसताना केवळ स्मशानभूमीतील लाकडाच्या मदतीने तपास करीत पोलिसांनी आरोपींचा माग काढला. ‘हरिभाऊ धुराजी जगताप (वय ७४, रा. गंगाखेड, परभणी) असे खून झालेल्याचे नाव आहे. मृताचा मुलगा सचिन (सध्या रा. कोल्हापूर) यांनी वालचंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दादासाहेब मारुती हरिहर (वय ३०) आणि त्याचा मित्र विशाल सदाशिव खिलारे (वय २३, दोघेही रा. फलटण, सातारा) यांना अटक करण्यात आली आहे,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली. देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास तावशी येथील स्मशानभूमीत मानवी किंवा अमानवी अवयव जळत असून, बाजूला मोठ्या प्रमाणात रक्त सांडल्याची माहिती तावशीच्या पोलिस पाटलांनी वालचंदनगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्या वेळी स्मशानभूमीतील लोखंडी जाळीवरील पूर्ण जळालेली हाडे आणि तेथून ४० फूट अंतरावर रक्त सांडलेल्याचे दिसून आले. त्यामुळेहा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय बळावला.
पुणे जिल्ह्यात २५९ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; बागूल, मानेंसह मनसे, वंचितच्या उमेदवारांचा समावेश
वालचंद पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी स्मशानभूमीतील जळकी लाकडे ताब्यात घेऊन वखारीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी इंदापूर, माळशिरस आणि फलटण भागात त्यांनी चौकशी केली. त्यानंतर ती लाकडे गुणवरे (ता. फलटण) येथील वखारीतील असल्याचे कळाले. तेथे चौकशी केल्यावर दादासाहेब हरिहर आणि विशाल खिलारे यांनी अंत्यविधीसाठी लाकडे नेल्याचे विक्रेत्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार, वालचंदनगर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता खुनाचा गुन्हा उघडकीस आला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक निरीक्षक राजकुमार डुणगे, कुलदीप संकपाळ, अंमलदार शैलेश स्वामी, गुलाबराव पाटील यांनी तपास केला.
रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! पश्चिम रेल्वेवरुन सुटणाऱ्या ८३ रेल्वेगाड्यांच्या थांब्यात मोठे बदल; वाचा लिस्ट
जत्रेच्या जेवणाच्या बहाण्याने निमंत्रण मृत हरिभाऊ जगताप याची आरोपी दादासाहेब हरिहर याच्या बायकोवर वाईट नजर असल्याच्या संशयावरून कट रचून त्यांना गंगाखेड येथे यात्रेत जेवण करण्याच्या निमित्ताने आणण्यात आले. १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री तावशी येथील स्मशानभूमीजवळ लघुशंकेसाठी गाडी थांबवून हरिभाऊ जगताप यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जगताप यांचा मृतदेह स्मशानभूमीत जाळल्याची कबुली आरोपींनी दिली. उपनिरीक्षक मिलिंद मिठापल्ली तपास करीत आहेत