• Sat. Sep 21st, 2024
अजितदादांना मुख्यमंत्री करा, मी ठराव मांडतो, माझ्या पक्षाचा पाठिंबाही देतो : भास्कर जाधव

नागपूर : अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. माझ्या पक्षाच्या पाठिंब्याची हमी मी देतो, असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत केले. अजित पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाबद्दल मी आत्ता ठराव मांडतो, मला तुमच्यातला दम मला बघायचा आहे, असे आव्हानही त्यांनी भाजपला दिले.

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. भास्कर जाधव यांनी नेहमीप्रमाणे आक्रमक शैलीत विधानसभेत भाषण करून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. भास्कर जाधव यांनी कोकणच्या विकासाचा प्रश्न विधानसभेत मांडला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांना कोकणच्या विकासाला हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यावेळी त्यांना सत्ताधारी पक्षातील आमदारांनी डिवचले. मग मात्र भास्कररावांनी भाजप आमदारांना अगदी कोरोना काळापासून ते रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून जोरदार सुनावले.
मोदींच्या मेक इन इंडियामध्ये कांदा बसत नाही का? शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू बरसले
अजितदादांना मुख्यमंत्री करा, मी ठराव मांडतो, माझ्या पक्षाचा पाठिंबाही देतो

भास्कर जाधव कोकणामधील प्रश्नांवर बोलत होते. रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून ते सत्ताधाऱ्यांना दोष देत होते. यावेळी महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी काय केले? असे सवाल भाजप आमदार सातत्याने करत होते. आपल्या भाषणात व्यत्यय आणणाऱ्या भाजप आमदारांकडे भास्कर जाधवांनी मोर्चा वळवला. त्याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोकणच्या विकासाबद्दल साद घातली. त्यावर पुन्हा भाजप आमदारांनी शेरेबाजी केली असता, अजित पवार यांना आत्ता मुख्यमंत्री करा, माझ्या पक्षाच्या पाठिंब्याची हमी मी देतो, असे भास्कर जाधव म्हणाले.

सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर पंचनाम्याचं थोतांड थांबवून कर्जमाफी करावी : उद्धव ठाकरे
कोकणच्या विकासाबद्दल मी अजित पवार यांना साद घालतोय. कारण जिथून प्रश्न सुटणार असतील तिथून ते सोडवले पाहिजेत, असेही भास्कर जाधव म्हणाले. त्याचवेळी भाजप ज्याच्या ज्याच्याबरोबर मैत्री करेल, त्याचे वाटोळे करेल, असा टोलाही भास्कर जाधव यांनी लगावला.

आजचा अग्रलेख: पत्र येता अवचित…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed