• Mon. Nov 25th, 2024

    शिक्षकांची खाती पुन्हा मुंबई बँकेत,राजकीय लाभातून निर्णय झाला म्हणत शिक्षक संघटनांचा विरोध

    शिक्षकांची खाती पुन्हा मुंबई बँकेत,राजकीय लाभातून निर्णय झाला म्हणत शिक्षक संघटनांचा विरोध

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई : शिक्षण विभागाने मुंबईतील शिक्षकांची बँक खाती युनियन बँकेतून काढून मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरोधात शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे.

    मुंबईतील खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतन शिक्षक सेना आणि इतर संघटनांच्या तीव्र आंदोलनांमुळे सरकारने २०१८मध्ये आदेश काढून युनियन बँक ऑफ इंडियामधून अदा करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी हे वेतन मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतून देण्यात येत होते. शिक्षक संघटनांनी त्याला विरोध दर्शवत प्रखर आंदोलने केली होती. मात्र आता पुन्हा ५ डिसेंबरला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतून वेतन अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने हा निर्णय राजकीय लाभापोटी आणि वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी घेतला आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे ज. मो. अभ्यंकर यांनी केला आहे. तसेच हा आदेश मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
    सकाळची शाळा नकोच, राज्यपालांच्या सूचनेला पालकांचाही पाठिंबा, झोपेनुसार वेळ बदलण्याची मागणी
    ‘यापूर्वी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शिक्षकांना वेतन मिळण्यास विलंब झाला होता. तसेच बँकेच्या सुविधा मिळविताना अडचणी येत होत्या. आता युनियन बँकेतून सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत. मात्र तरीही बँक खाती वळविण्याचा घेतलेला निर्णय हा राजकीय दबावातून घेण्यात आला आहे’, असा आरोप महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांनी केला आहे. हा निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

    मोठी बातमी: दिशा सालियन मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंची एसआयटीमार्फत चौकशी होणार?
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *