Gudi Padwa 2026: हिंदू धर्मात गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी गुढी उभारण्यासह नव्या वस्तू, वास्तूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे गेल्या आठवड्याभरापासून बाजारपेठेत चैतन्य आले आहे.
यंदा मध्य पूर्वेत युद्ध सुरू असले, तरी सर्वच क्षेत्रांत तेजीचे वातावरण असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. वाहन बाजारात आज दिवसभरात बाराशे ते पंधराशे चारचाकी व तीन ते साडेतीन हजार दुचाकी विक्रीचा अंदाज आहे. रिअल इस्टेट क्षेत्रालाही झळाळी मिळणार आहे. सध्या शहरात दहा हजारांहून अधिक सदनिका व रो-हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आजच्या मुहूर्तावर सहाशे ते नऊशे सदनिका, व्यावसायिक वस्तूंचे बुकिंग होण्याचा अंदाज आहे. पाडव्यानिमित्त सराफ बाजारात दोनशे कोटींच्या उलाढालीची शक्यता आहे. शुद्ध सोन्याची खरेदी होण्याची चिन्हे आहेत. इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत एसी, फ्रीज, वॉशिंग मशीन, कूलरसह इलेक्ट्रिक शेगडीला मागणी आहे.
Nashik Bribe Case: नाशिक जिल्हा परिषदेत ACBची मोठी कारवाई! महिला अभियंत्याला लाच स्वीकारताना पकडलं रंगेहाथ, प्रकरण काय?
सोन्या-चांदीचे दर उतरल्याने
गुंतवणूकदारांचा ओढा
अमेरिका, इस्त्रायल-इराण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आहे. शेअर बाजारही घसरले आहेत. या स्थितीत सोन्या-चांदीचे दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून चोख सोने खरेदीकडे ग्राहकांचा कल असल्याचे सराफा व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मागील महिन्यात पावणेदोन लाखांपर्यंत गेलेले सोने जवळपास २५ हजारांनी कमी होऊन दीड लाखांपर्यंत उतरले आहे. त्यामुळे आज सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी होण्याचा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. बुधवारी नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह एक लाख ५६ हजार रुपये, तर चांदीचे दोन लाख ५७ हजार ५०० रुपये होते.
Nashik News: दहावीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरात नको त्या वस्तू! साडी, हिरवा चुडा, गर्भनिरोधकांची पाकिटे अन् बरेच काही…
युद्धस्थितीमुळे सुरक्षित गुतवणूक म्हणून सोने-चांदी खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. दरही कमी झाल्यामुळे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जोरदार खरेदी होण्याची अपेक्षा आहे. – मयूर शहाणे, सराफा व्यावसायिक
कारना गेल्या वर्षीपेक्षा अधिक मागणी असून, इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दहा टक्क्यांनी वाढली आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे सुट्या भागांचे उत्पादन कमी झाल्याने काही वाहनांचा प्रतीक्षा कालावधी दुपटीने वाढला आहे. -पंकेश चंद्रात्रे, वाहन वितरक
आज मुहूर्तावर सहाशे ते नऊशे सदनिका, व्यावसायिक वास्तूंची बुकिंग होण्याची शक्यता आहे. परवडणाऱ्या घरांसह व्यावसायिक वास्तूंना मागणी आहे. – सुनील गवादे, अध्यक्ष, नरेडको
