Mumbai-Pune Expressway Accident: बुधवारी द्रुतगती मार्गावरील भीषण दुर्घटनेनंतर गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा अपघातात तीन मित्रांचा मृत्यू झाला आहे. या थरारक अपघतात गाडीचा चेंदामेंदा झाला आहे
कार पलटी झाल्यामुळे अपघात
आज सकाळी तीन तरूण लोणावळ्यावरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. या वेळी त्यांची पोलो कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत ओमकुमार बोरसे (वय 23), लय भारत (वय 22) आणि श्रेयांश शर्मा या तीन तरुणांचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. हे तिघेही पवई येथील आयआयटी मुंबई येथे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात, गाडीवर कंटेनर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, हे तरुण काल मुंबईहून कारने लोणावळा येथे गेले होते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे ते पुन्हा मुंबईकडे परतत असताना एक्सप्रेसवेवर कार रेसिंग सुरू झाले. ओव्हरटेकच्या नादात पोलो कार पलटी होऊन हा अपघात झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
बुधवारीही अशीच एक दुर्घटना
ही घटना ताजी असतानाच काल घडलेला आणखी एक भीषण अपघात अद्याप सर्वांच्या स्मरणात आहे. काल एका कंटेनरने समोरील पाच वाहनांना चिरडल्याने इनोव्हा कारमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला होता. त्या दुर्घटनेनंतर अवघ्या 24 तासांत पुन्हा तीन बळी गेल्याने एक्सप्रेसवेवरील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Sangli Crime : मंदिरात दर्शन घेऊन परतताना घात, सांगलीतील शिक्षण संस्था संचालकाला घराजवळ संपवलं, कुटुंबाचा आक्रोश
अपघाताची माहिती मिळताच पनवेल पोलीस, ‘देवदूत’ यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य ॲम्ब्युलन्स आणि हेल्प फाउंडेशनचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी मोठ्या शिताफीने कारमध्ये अडकलेल्या तरुणांना बाहेर काढले; मात्र तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून काही तासांनंतर वाहतूक सुरळीत केली. सलग घडणाऱ्या या दुर्घटनांमुळे “एक्सप्रेसवेवर प्रवास करणे सुरक्षित आहे का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
