• Mon. Nov 25th, 2024
    आरबीआयकडून महाराष्ट्रातील बँकेवर मोठी कारवाई, थेट परवाना रद्द

    कोल्हापूर: बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचं साधन नसल्याचे कारण देत आरबीआयने कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं सोमवारी ही कठोर पावलं उचलत मोठी कारवाई केली असून आरबीआयनं बँकेला ४ डिसेंबर २०२३ पासून सर्व प्रकारचे व्यवहार बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

    कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना रद्द करण्यात आली असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली आहे. रिझर्व बँकेकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेड,इचलकरंजी कोल्हापूर ही येत्या ४ डिसेंबर २०२३ पासून कोणत्याही प्रकारची बँकिंग सेवा देऊ शकत नाही. यासोबतच बँकेत कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास किंवा पैशाचे व्यवहार करण्यास पूर्णपणे बंदी घालत आहे, असे म्हणण्यात आले आहे.
    नवीन पक्ष का नाही काढला? दादांच्या त्या व्हिडीओवरून आव्हाडांचा हल्ला, मुश्रीफांकडून प्रत्युत्तर
    बँकेकडे पुरेसं भांडवल आणि कमाईचं साधन नसल्याने सध्याची बँकेची असलेली आर्थिक स्थिती पाहता बँक सध्याच्या ठेवीदारांना पूर्ण पैसे देऊ शकणार नाही आणि बँकेला बँकिंग सेवा चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक ग्राहकांवर विपरित परिणाम होईल, असे पत्रकात म्हटले आहे. दरम्यान या बँकेमध्ये जमा असलेल्या ग्राहकांच्या पैशाचा संदर्भात देखील त्यांनी पत्रकात माहिती दिली असून बँक ग्राहकांना ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते. DICGC ही भारतीय रिझर्व्ह बँकेची सब्सिडिरी आहे. जी ५ लाख रुपयांपर्यंत विमा सुविधा प्रदान करते. अशा परिस्थितीत ज्या ग्राहकांनी ५ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी रक्कम बँकेत जमा केली आहे, त्यांना संपूर्ण पैसे परत मिळतील. तर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त असलेले ग्राहक केवळ ५ लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी दावा करू शकतील, असे ही म्हटले आहे
    आता आमचा योग्य पद्धतीने सुखाचा संसार सुरु झालाय, शंभूराज देसाईंची साताऱ्याच्या जागेबद्दल सावध भूमिका,म्हणाले..
    शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँकेत पदाचा दुरूपयोग करत नियमबाह्य कर्ज वाटप करून तब्बल ३ कोटी ५८ लाख ३७ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अध्यक्ष, त्याची पत्नी व शाखाधिकारी, आदींसह १९ जणांवर गावभाग पोलीस ठाण्यात ऑगस्ट २०२३ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता . याप्रकरणी प्रशासक धोंडीराम आकाराम चौगुले (रा. राजारामपुरी कोल्हापूर) यांनी तक्रार दिली होती.
    बिद्री कारखान्याची उद्या मतमोजणी; मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, कोणत्या गटाला फायदा होणार?

    शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही, कार्यालयाची तोडफोड; ठाकरे गट आक्रमक

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *