• Mon. Nov 25th, 2024

    सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव, महात्मा फुले स्मृतीदिनाला विचारांचा जागर, ठाण्यात सत्यशोधक दिंडी

    सत्यशोधक समाजाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव, महात्मा फुले स्मृतीदिनाला विचारांचा जागर, ठाण्यात सत्यशोधक दिंडी

    मटा प्रतिनिधी, ठाणे : महात्मा जोतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रीत्यर्थ ठाण्यात सत्यशोधक दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीत खा. सुप्रिया सुळे , मा. खा. हरिभाऊ राठोड, ॠता आव्हाड, केदार दिघे, डॉ. आनंद तेलतुंबडे, उर्मिला पवार, अर्जुन डांगळे, महेश केळुसकर , सुधाकर यादव , एम. ए. पाटील, जितेंद्र इंदिसे, अतुल गोरे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते. दरम्यान, या रॅलीच्या समारोपानंतर झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांचा फुले पगडी घालून सन्मान करण्यात आला.

    मशिदीवरचे भोंगे काढायला सांगितले होते, ते काढता आले नाहीत, कसले बाळासाहेबांचे विचार? राज ठाकरे यांची टीका
    महात्मा जोतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस २०२३ मध्ये १५० वर्षे पूर्ण होत आहेत. २८ नोव्हेंबर रोजी महात्मा जोतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. ठाणे शहर व जिल्ह्यात तसेच मुंबई आणि नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सामाजिक संस्था, महिला व कामगार संघटनांच्या वतीने डाॅ. प्रज्ञा दया पवार, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, मुक्ता श्रीवास्तव, निर्मला पवार, संजय भालेराव आदींनी पुढाकार घेऊन “सत्यशोधक विचार संवर्धन समिती, ठाणे” स्थापन करून भगवती मैदान (विष्णूनगर, नौपाडा) ते कॉ. गोदुताई परुळेकर उद्यान (गणेशवाडी, ठाणे महानगरपालिकेजवळ) अशी दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी सत्यशोधकांनी हातामध्ये सामाजिक लढ्यातील कर्मवीर भाऊराव पाटील, पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आदी अग्रणींची छायाचित्रे, तसेच त्यांचे विचार दर्शवणारे फलक हाती घेतले होते.

    Gold Rate Today: सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाताय? जाणून घ्या आजचे दर काय
    या दिंडीचा समारोप गोदूताई परुळेकर उद्यानात करण्यात आला. सुरुवातीला अनुबंध, भारतीय महिला फेडरेशन, समता विचार प्रसारक संस्था, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, परिसर सखी मंडळ आदी संस्थांनी गीते, पथनाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉ. मुक्ता मनोहर होत्या आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के. इ. हरिदास हे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी मुक्ता मनोहर आणि अब्दुल कादर मुकादम यांचा फुले पगडी देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ आणि वृषाली विनायक यांनी केले तर आभार प्रदर्शन समितीच्या वतीने जगदीश खैरालिया यांनी केले.

    कोरडवाहूला एकरी २५ हजार तर बागायतीला एकरी ५० हजार रुपयांची तात्काळ मदत द्या, नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभय कांता, सुब्रतो भट्टाचार्य, ओसामा रावळगावकर आणि निर्मला पवार, अजय भोसले आदी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने आणि सत्य की जय हो या घोषणेने झाली.

    दहा दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांचा पहिला व्हिडिओ आला समोर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *