• Mon. Nov 25th, 2024

    थेट पोलिसावरच चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल; अल्पवयीन मित्रामुळे प्रकार उघडकीस, नेमकं काय घडलं?

    थेट पोलिसावरच चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल; अल्पवयीन मित्रामुळे प्रकार उघडकीस, नेमकं काय घडलं?

    म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : शहरात एका पोलिस कर्मचाऱ्यानेच अल्पवयीन मित्राच्या मदतीने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याचा प्रकार पुढे आला आहे. गेल्या रविवारी (दि. १२) लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे ज्या मित्राच्या मदतीने ही जबरी चोरी यशस्वी करण्यात आली त्या मित्रानेच बोभाटा केल्याने हा प्रकार पुढे आला आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने संशयित पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. संशयित पोलिसावर यापूर्वी लाच घेतल्याचा गुन्हाही दाखल आहे.

    काय आहे प्रकरण?

    सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. योगेश शंकर लोंढे असे संशयित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस मुख्यालयात त्याची नियुक्ती आहे. १२ नोव्हेंबरला त्र्यंबकेश्वर रोडवरील जिल्हाधिकारी निवासस्थानामागील रस्त्याने महिला पायी चालली होती. त्या वेळी लोंढे हा एका सतरावर्षीय मित्रासह मद्यधुंद अवस्थेत दुचाकीवरून आला. त्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडले. काही अंतरावर जाताच त्याचे आणि मित्राचे मतभेद झाले. हा वाद वाढला. त्यामुळे संबंधित अल्पवयीन मुलाने पोलिसांना घडलेला प्रकार कळविला. सरकारवाडाचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर पथकासह घटनास्थळी पोहोचले. गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे निरीक्षक रणजित नलावडे यांनाही संशयिताबाबत माहिती मिळाली. त्यानुसार लोंढे याला ताब्यात घेण्यात आले. तो पोलिस शिपाई असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
    पोलिसाची नजर फिरली अन् नको ते करुन बसला, CCTVमुळं पितळं उघड; नेमकं काय घडलं?
    यापूर्वी झाले होते निलंबन

    मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी करून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लोंढे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच वर्षांपूर्वी अटक केली होती. खातेनिहाय चौकशीनंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. निलंबनाचा काळ संपल्यावर तो जनरल ड्युटी करीत होता. त्यानंतर बरोबर पाच वर्षांनी त्याला दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *