• Tue. Jun 9th, 2026
    CCTV : लहान बाळाचा हात लिफ्टच्या दारात अडकला, पुण्यातील सोसायटीत गोंधळ, सुदैवाने गंभीर प्रसंग टळला

    Dighi Baby hand stuck in Lift Door : लिफ्टमधून उतरत असताना एका बाईच्या हातातील लहान बाळाचा हात अचानक लिफ्टच्या दरवाज्यात अडकला. त्यामुळे काही क्षणांसाठी लिफ्टमध्ये एकच गोंधळ उडाला

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुण्यातील दिघी परिसरातून एक धक्कादायक आणि तितकाच सावध करणारा प्रसंग समोर आला आहे. सोसायटीतील लिफ्टमध्ये एका लहान बाळाचा हात दरवाज्यात अडकल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

    नेमकं काय घडलं?

    मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या दिघी भागातील सोसायटीतील काही महिला आणि पुरुष लिफ्टमधून उतरत असताना एका बाईच्या हातातील लहान बाळाचा हात अचानक लिफ्टच्या दरवाज्यात अडकला. काही क्षणांसाठी लिफ्टमध्ये एकच गोंधळ उडाला. बराच वेळ बाळाचा हात बाहेर काढण्यासाठी संघर्ष सुरु होता.

    बाळ सुदैवाने सुखरुप

    उपस्थित महिलांनी आणि नागरिकांनी तत्काळ प्रसंगावधान राखत लिफ्ट थांबवण्याचा प्रयत्न केला आणि बाळाचा हात सुरक्षितपणे बाहेर काढला. या घटनेत सुदैवाने बाळाला गंभीर दुखापत झाली नाही. मात्र काही क्षण निर्माण झालेला तणाव आणि संभाव्य धोका सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून येतो.

    ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून, विशेषतः लहान मुलांसोबत लिफ्ट वापरताना अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    पाहा सीसीटीव्ही व्हिडिओ :

    चिमुरड्यांबाबत काळजी घेण्याचं आवाहन

    दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी याला गंभीर इशारा मानत पालकांनी आणि सोसायटी व्यवस्थापनाने लिफ्ट सुरक्षिततेबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे.
    Maharashtra TimesCrime News : जुनं प्रेम विसरता येईना, तरुणाने झाडावर आयुष्य संपवलं, लेकाची बॉडी पाहून आई कोसळली, नाईक कुटुंब धक्क्यात

    नवले पूल परिसरात पुन्हा अपघात

    दुसरीकडे, कात्रज बाह्यवळण रस्त्यावरून नवले पुलाकडे निघालेल्या भरधाव ट्रकने समोरील वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून. सहा वाहनांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर ट्रकचालक वाहन सोडून फरारी झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. अश्पाक हनीफ चौधरी (रा. कोंढवा) असे मृताचे नाव आहे. अल्ताफ लियाकतअली भेलमे ( वय ३०, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
    Maharashtra TimesMumbai Crime : डॉ कुलकर्णी ऑपरेशनसाठी आल्या नाहीत? रुग्णालयात धावाधाव, कार्यालयात पाहिलं, महिला डॉक्टरने प्राण सोडलेले
    सिंहगड रस्ता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज बाह्यवळण मार्गावरून नवले पुलालाकडे निघालेल्या भरधाव ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने नवले पूल येथील सिग्नलवर थांबलेल्या वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात एक दुचाकीचीस्वार ट्रकखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला; तसेच सहा चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    Sunetra Pawar : अजित दादांविषयी बारामतीकरांना मी काय सांगणार.. भाषणादरम्यान सुनेत्रा पवार भावुक

    घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी, सिंहगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले; तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश सतीश बेंद्रे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते मटासोबत काम करत आहेत. राजकीय, गुन्हेगारी आणि मनोरंजन या विषयातील बातम्यांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. ब्रेकिंग न्यूजसोबतच निवडणूक विषयक विश्लेषण करण्यात त्यांना अधिक रस आहे. त्यांनी झेविअर्स कॉलेजमधून मास कम्युनिकेशनचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. आतापर्यंत एबीपी माझा, टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 12 वर्षांहून अधिक काळचा अनुभव त्यांना आहे… आणखी वाचा