Gas Cylinder Black Market Busted In Yavatmal: भरारी पथकांने कारवाई करत भंडारा, गोंदिया, यवतमाळ जिल्ह्यातून कायदेशीर साठवून ठेवलेले गॅस सिलिंडर जप्त केले आहेत.
भंडारा जिल्हा पुरवठा विभागाने एका विशेष मोहिमेंतर्गत छापा टाकून बेकायदेशीर साठवून ठेवलेले गॅस सिलिंडर जप्त केले आहेत. पहिली कारवाई भंडारा शहरातील राजीव गांधी चौक परिसरात करण्यात आली. या ठिकाणी एचपीसीएल कंपनीचे चार घरगुती गॅस सिलिंडर बेकायदेशीररित्या साठवून ठेवल्याचे आढळले. दुकान मालक नरेश श्रावण माकडे याच्याकडे सिलिंडरबाबत कोणतेही वैध कागदपत्रे किवा खरेदी पावती उपलब्ध नव्हती.
Crime News : मुलगी नको, घरातच गर्भपाताचं रॅकेट, पोटच्या गोळ्याला पोटातच संपवलं, छ.संभाजीनगरमधील घटना उघड
प्रशासनाने हे चारही सिलिंडर घटनास्थळावरून जप्त केले आहेत. दुसरी कारवाई दवडीपार येथील सीएससी सेंटरवर करण्यात आली. जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या केंद्राची तपासणी केली असता, तिथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संदेश आणि मंगेश विलास रामटेके हे एकाच ठिकाणाहून दोन सेंटर्स चालवत होते. गोंदिया जिल्ह्यात १७ सिलिंडर जप्त करून एकाला अटक केली आहे.
Bhandara Crime: विद्यार्थिनींशी आक्षेपार्ह वर्तन; संतप्त गावकऱ्यांचा शिक्षकाला चोप, ZP शाळेतील प्रकार
पुसदमध्ये धडक कारवाई
यवतमाळ जिल्ह्यातील पुसदमध्ये एका घरातून ४० गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. एका घरात या सिलिंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. याविषयीची माहिती मिळताच भरारी पथकाने पुसदमधील नूर कॉलनीतील सुभाष वॉर्ड येथील आरिफ मोहम्मद कच्ची यांच्या घरावर छापा टाकाला. त्यांना सिलिंडरचा मोठा साठा एका खोलीत ठेवल्याचे आढळून आले. पुसद पोलिसांनी अरिफ कच्ची याच्यावर जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलमाखाली गुन्हे दाखल करून अटक केली आहे. आरोपीने हे सिलिंडर कुठून आणले त्याची चौकशी पोलिस करीत आहेत.
