• Mon. Nov 25th, 2024

    मराठा समाज मागसलेला नाही, गरिबांची भाकरी प्रस्थापितांनी हिसकावू नये: ओबीसी नेते प्रकाश शेंडगे

    मराठा समाज मागसलेला नाही, गरिबांची भाकरी प्रस्थापितांनी हिसकावू नये: ओबीसी नेते प्रकाश शेंडगे

    नांदेड: एकीकडे जरांगे पाटील हे ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी ठाम आहेत, तर दुसरीकडे मंत्री छगन भूजबळ यांच्यासह अनेक ओबीसी नेते जरांगे पाटलांच्या या मागणीला जोरदार विरोध करत आहेत. त्यातच आता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी थेट मराठा समाजाला इशाराचं दिला आहे. जर तुम्ही एक भुजबळ पाडला तर आम्ही १६० मराठा आमदार पाडू असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे होणाऱ्या ओबीसी समाजाच्या सभेसाठी प्रकाश शेंडगे हे गुरुवारी नांदेडला आले होते. या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

    ओबीसी समाजाच्या हिताची भूमिका घेणारे मंत्री छगन भुजबळ यांना मराठा समाजाने मतदान करू नये असे आवाहन केले जात आहे. मात्र, महाराष्ट्रात ओबीसींची संख्या ६० टक्के आहे. भुजबळ यांच्या मतदार संघात फक्त मराठा मतदार नाहीत तर सर्वच जाती-धर्माचे लोक आहेत, तरीही त्यांना टार्गेट केलं जात आहे. पण ओबीसी समाज १६० मतदार संघात आहेत. तुम्ही भुजबळ यांना पाडलं तर सर्व ओबीसी समाज १६० मतदार संघात मराठा आमदारांना पाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. यावेळी त्यांच्या सोबत ओबीसी नेते लक्ष्मण गायकवाड हे उपस्थित होते

    मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडली; छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला, वाचा नेमकं काय म्हणाले?
    महाराष्ट्रात मणिपूरसारखी पुनरावृत्ती होण्याची शक्यता:

    मराठा आरक्षणासाठी हिंसक आंदोलन होत आहेत. आमदारांची घरं जाळली जात आहेत. आम्ही सरकारकडे ओबीसी नेत्याना सुरक्षा देण्याची मागणी केली. काही नेत्यांना सरकारने सुरक्षा दिली. पण काही नेत्यांना दिली नाही . आम्ही आमची सुरक्षा करण्यास सक्षम आहोत . पण त्यानंतर जे घडेल त्याची जबाबदारी सरकारची असेल असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला.

    दरम्यान, महाराष्ट्राने अशी आंदोलनं पाहिली नाहीत. गावबंदी , जाळपोळ होतं आहे. हे असंच होतं राहिले तर मणिपूर सारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता असल्याचे प्रकाश शेंडगे म्हणाले. बीड मधील हिंसक घटनातील मास्टर माईंड सरकारला सपडत नसेल तर आम्हाला सांगा आम्ही शोधून देऊ असं शेंडगे म्हणाले.

    निवडणूक आयोग भाजपच्या खिशात, वडेट्टीवारांचा गंभीर आरोप; ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी शाहांवर कारवाई करण्याची मागणी
    जात पडताळणीची प्रकिया होईपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देवू नये:

    सध्या राज्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे . त्यात मारवाडी आणि जैन समाजाच्या नोंदी देखील सापडल्या आहेत . मग त्यांना पण ओबीसीतून आरक्षण द्यायचं का असा सवाल ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी उपस्थित केला. ज्याची नोंद सापडली आहे, त्यांना कुणबी पण जात पडताळणीची प्रकिया झाल्या शिवाय कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत घालू नका अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली.

    छगन भुजबळ ते गोपीचंद पडळकर, ओबीसी एल्गार सभेसाठी बडे नेते उपस्थित राहणार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed