• Sat. Sep 21st, 2024
माझं लग्न होणार नाही; भावासमोर तरुणानं व्यथा मांडली अन् टोकाचा निर्णय घेतला, कुटुंबाचा आक्रोश

बुलढाणा: आजच्या डिजिटल युगामध्ये युवकांमध्ये अनेक स्पर्धा आणि तारुण्यांमध्ये लग्न न होणे, यामुळे अनेक वेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर येत आहे. नेमकं असाच प्रकार बुलढाण्यातून समोर आला आहे. दिवाळीमध्ये एका तरुणाने याच कारणामुळे आपली जीवनयात्रा संपवून संपूर्ण परिवाराला अंधारात लोटले आहे.
माता न तूं वैरिणी! एक पाय कापलेल्या अवस्थेत अर्भक आढळले; घटनेनं परिसरात खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच वर्षापासून लग्न होत नसल्याने निराशा आल्याने एका ३४ वर्षीय युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आपले जीवन संपल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना १५ नोव्हेंबरच्या सकाळी सात वाजता बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा खुर्द येथे उघडकीस आल्याने या भागात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर गुजर असे या युवकाचे नाव आहे. याबाबत दत्तात्रय रमेश गुजर (३६) राहणार नांदुरा खुर्द यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की त्यांचा लहाना भाऊ मृतक ज्ञानेश्वर गुजर यांचे मागील चार ते पाच वर्षापासून लग्न होत नसल्याने तो नेहमी निराश राहत होता. मला लग्नाला मुलगी मिळणार नाही माझं लग्न होणार नाही असे तो नेहमी म्हणायचा.

५० एकरावर सभा, पार्किंगसाठी १५० एकर जागा; साताऱ्यात मराठा बांधवांकडून जरांगेंच्या सभेची जय्यत तयारी

याच नैराश्यातून त्याने घरातील सिलिंग फॅनला आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी नांदुला पोलिसांनी कलम १७४ आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पृथ्वीराज इंगळे करत आहेत. अनेक वेळा नैराश्यातून बाहेर येण्याकरता प्रबोधन केले जाते. युवक पिढीला अनेक डिजिटल प्लॅटफॉर्मवरून देखील या बाबी अवगत केल्या जातात. मात्र त्या डिजिटल युगात आजचे हे तरुण युवक असे टोकाचे पाऊल उचलत असतील तर वेळेवरच पालकांनी सावध होऊन त्यांचे मनोबल वाढवणे यांना धीर देणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed