• Sat. Sep 21st, 2024

ऐंशीचा लाईट घेतला आठशेला, घोटाळा फाइलबंद, दोषींना अभय? कारवाई कशामुळं प्रलंबित राहिली?

ऐंशीचा लाईट घेतला आठशेला, घोटाळा फाइलबंद, दोषींना अभय? कारवाई कशामुळं प्रलंबित राहिली?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ऐंशी रुपयांचा एक एलईडी लाईट चक्क आठशे रुपयांना खरेदी करून एका लाईटमागे ७२० रुपये लुटल्याचा प्रकार सुमारे चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेत उघडकीस आला होता. प्राथमिक चौकशीत दिडशे सरपंच व तितकेच ग्रामसेवकांना दोषी असल्याचे समोर आले होते. हे प्रकरण स्थानिक लेखापरीक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले. मात्र, अद्यापही विभागाचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे ही फाईल बंद झाली की काय आणि सगळ्यांना अभय प्रदान केले की काय? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
‘बिस्किटप्रिय’ डॉक्टरची चौकशी पूर्ण; भूल दिल्यानंतर महिलांना ठेवले होते ताटकळत
१४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींमार्फत हे एलईडी लाइट खरेदी करण्यात आले. हे लाइट वास्तविक दरापेक्षा अधिक पटीने खरेदी करण्यात आले होते. ऐंशी रुपयांचा लाईट चक्क आठशे रुपयांना विकत घेण्यात आल्याचा आरोप बोरखेडी सर्कलचे भाजपचेच सदस्य रूपराव शिंगणे यांनी केला होता. तत्कालीन सीईओ कादंबरी बलकवडे यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या प्राथमिक तपासात या आरोपांमध्ये तथ्य आढळून आले. या चौकशीत जवळपास १५० ग्रामसचिव व तितक्याच सरपंचांना दोषी धरले गेले. काही ग्रामसेवकांची वेतनवाढ रोखण्यात आली. पुढे नवे सीईओ संजय यादव यांच्या काळात हे प्रकरण स्थानिक लेखापरीक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आले.
भाजप पदाधिकाऱ्याला संपवलं, M.P मधनू आरोपींना अटक; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर
दरम्यान, योगेश कुंभेजकरांनंतर सौम्या शर्मासुद्धा सीईओपदी रुजू झाल्या. याला आता तीन वर्षे उलटली. परंतु, अद्यापही या लेखापरीक्षणाचा अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला नाही. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक चौकशीत ३०० जण दोषी व घोटाळ्याची व्याप्ती मोठी असताना यावर का निर्णय होत नाही, या सर्व बाबी संशय निर्माण करणाऱ्या आहेत. आता ही फाइल उघडणार की शासनाच्या पैशांची अशाच पद्धतीने पदाधिकारी व अधिकारी उधळपट्टी करीत राहील, हे कळायला मार्ग नाही.
संध्याकाळी बहिणीचे लग्न, सकाळी भावाचा अपघात, नागपूर रेल्वे स्टेशनवर बॅटरी कारची धडक
Read Latest Maharashtra News And Marathi News

ललित पत्की यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed