याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश आणि त्याचे वडील हे दोघेही रत्नागिरीतील आंग्रे पोर्ट येथे कामाला आहेत. आलीम यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची आहे.अशातच त्यांनी नोकरी करत उदरनिर्वाह सांभाळत नवीन घराचे बांधकामही सुरू केलं होतं. याच महिन्यात नवीन घरात अलीम कुटुंब गृहप्रवेश करणार होते. मात्र, नवीन घरात गृहप्रवेश करण्याआधीच वीस वर्षीय राकेश याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. घरातून नाईट शिफ्टला जातो सांगून तो निघाला होता.
सकाळी लवकर पाऊस पडल्याने नवीन घरातील सिमेंट व कलर भिजेल म्हणून आलिम यांनी धाव घेतली. याचवेळी हा सगळा धक्कादायक घटना समोर आली
मुलाने घराच्या बेडरुममधील लोखंडी बारला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या नातेवाईकांनी राकेशच्या गळ्याला बांधलेली दोरी कोयतीने कापून त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी राकेशला तपासून मृत घोषित केले.
याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकुलत्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली याचे प्राथमिक कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी विरेंद्र विलास बेंद्रे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. अधिक तपास रत्नागिरी जयगड पोलीस करत आहेत
Read Latest Maharashtra News And Marathi News