• Fri. Mar 20th, 2026

    Pune Metro: मेट्रोतून उतरलं की रिक्षा तयार! पुण्यातील ‘नळ स्टॉप’ मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी नवी सुविधा; किती असेल भाडे?

    Pune Metro: मेट्रोतून उतरलं की रिक्षा तयार! पुण्यातील ‘नळ स्टॉप’ मेट्रो स्थानकावर प्रवाशांसाठी नवी सुविधा; किती असेल भाडे?

    Nal Stop Metro Station: पुणे मेट्रोच्या एसएनडीटी-नळ स्टॉप मेट्रो स्थानकापासून फीडर रिक्षा सेवेला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. यामुळे प्रवास सोपा व सुखकर होणार आहे.

    स्नेहल निमगिरे, पुणे: पुण्यातील मेट्रो प्रवाशांसाठी आता ‘लास्ट माईल कनेक्टिव्हिटी’ची समस्या कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे मेट्रो प्रशासन आणि रिक्षा संघटनांच्या संयुक्त पुढाकारातून एसएनडीटी-नळ स्टॉप मेट्रो स्थानकापासून फीडर रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास केल्यानंतर घरी किंवा परिसरातील इतर ठिकाणी पोहोचणे प्रवाशांसाठी अधिक सोपे होणार आहे.

    भाडेदर किती?

    या सेवेच्या पहिल्या टप्प्यात कोथरूड परिसरातील विविध भागांना जोडणारे चार वेगवेगळे मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये वारजे, डीपी रोड–राजाराम ब्रिज तसेच कर्वेनगर परिसरातील काही भागांचा समावेश आहे. अंतरानुसार प्रवाशांना प्रति सीट 20 ते 30 रुपये इतके भाडे आकारले जाणार आहे. तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून रिक्षा बुक करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. अ‍ॅपवरून रूट, थांबे आणि उपलब्ध रिक्षांची माहिती मिळते. राईड बुक केल्यानंतर एक कोड तयार होतो, तो चालकाला दाखवून प्रवासी प्रवास करू शकतात.Maharashtra TimesPune Metro: पुण्यात मेट्रो स्थानकांपासून ‘फीडर बस’सेवेसाठी पावले, PMPला नवा पर्याय; पहिल्या टप्प्यात दोन मार्गांसाठी प्रस्ताव

    या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी चंद्रकांत पाटील उपस्थित होते. “सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे ही सरकारची प्राथमिकता असून मेट्रोसह इतर वाहतूक व्यवस्थांनाही जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच भविष्यात इतर मेट्रो स्टेशनवरही अशा फीडर सेवांचा विस्तार करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत,” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

    दरम्यान, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक केले. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता मेट्रो आणि रिक्षा यांचे समन्वयित जाळे तयार होणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

    Maharashtra TimesPurandar IT Park: पुरंदरमध्ये ‘आयटी पार्क’ उभारणार, हिंजवडीवरील ताण कमी करण्याचं उद्दिष्ट; नव्या विमानतळाजवळ प्रकल्प प्रस्तावित

    वाहतुकीत अडथळा निर्माण न होण्याची अपेक्षा

    अनेक नियमित मेट्रो प्रवाशांनी या सेवेचे स्वागत केले आहे. मात्र, मेट्रो स्टेशन परिसरात रिक्षांसाठी स्वतंत्र जागा व व्यवस्थित व्यवस्थापन असावे, जेणेकरून वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, अशी मागणीही प्रवाशांकडून करण्यात आली आहे. अधिकारीही या सेवेमध्ये पुढील काही दिवसांत सुधारणा करण्याची तयारी दर्शवत आहेत.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा