• Thu. Nov 28th, 2024
    मानलं गड्या! ३२ वर्ष लढला, ५१ व्या वर्षी सरपंचपदाला गवसणी, भाजपचं पॅनल पाडलं

    अहमदनगर : ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकाल मात्र चर्चेत राहिलाय तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल ३२ वर्षांनंतर वयाच्या ५१ व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत थेट सरपंचपदाला गवसणी घातलीये. पोपट पुंड असं या विजयी उमेदवाराचं नाव आहे…. त्यांच्या विजयानंतर अख्ख्या गावाने जोरदार घोषणाबाजी, गुलालाची मुक्त उधळण केली. कार्यकर्त्यांनी पुंड यांना खांद्यावर नाचवत आनंद साजरा केला.

    नगरपासून अवघ्या पाच-सात किलोमीटरवर अरणगाव आहे. इथल्या ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांची सत्ता गेली अनेक वर्षे होती. या प्रस्थापित सत्तेला शह देण्याचे काम पोपट पुंड गेली अनेक वर्षे करत होते.

    विदेशातून गावात आल्या, गावच्या सरपंच झाल्या, एका चुकीमुळे फॉरेन रिटर्न महिलेनं पद गमावलं, कारण…

    • गुंड यांनी वयाच्या २० व्या वर्षी गावचे सरपंच व्हायचे म्हणून स्वप्न पाहिले.
    • मधल्या काळात त्यांनी २००२ ला पंचायत समिती
    • तर २०१४ ला सरपंच होण्यासाठी निवडणूक लढवली
    • पण त्यांना थोड्याफार मतांनी ३२ वर्षे पराभवाला सामोरे जावं लागलं
    • मात्र वयाच्या ५१ वर्षी त्यांचं निवडणुकीतील अपयशाचं ग्रहण सुटलं आणि ते सरपंच झाले
    • सातत्याने पराभव पाहावा लागत असला तरी त्यांनी जिद्द सोडली नव्हती.
    • गावामधील लोकसेवेची कामे त्यांची सुरू होती. जनसंपर्क चांगला होता.
    • सत्तेत नसले तरी गावच्या विकासासाठीच्या शासनाच्या योजना
    • गावात कशा येतील, यासाठी त्यांचे प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू होता.

    आम्हीच नंबर वन! ग्रामपंचायत निकालानंतर भाजप, शिवसेना, कॉंग्रेसचे दावे-प्रतिदावे
    नगर तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचं वर्चस्व आहे. त्यात पोपट पुंड यांनी १२ सदस्यांसह सरपंचपदावर बाजी मारलीये. त्यामुळे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत पराभव झालाय. ही निवडणूक या दोन्ही मोठ्या नेत्यांसाठी धक्कादायक ठरलीये.

    ३२ वर्ष निवडणूक लढला; वयाच्या २० व्या वर्षापासून प्रत्येकवेळी पडला, ५१ व्या वर्षी सरपंचपदाचा गुलाल उधळला!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed