Pune Accident News : राज्यात अपघातांचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. अशातच पुण्यातील ओतूरजवळ एका कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघात होताच चालक फरार
या अपघातात स्विफ्ट कारचालक अनिकेत (मयूर) नामदेव पानसरे (रा. ओतूर) यांचा जागीच मृत्यू झाला. स्थानिकांच्या मते, धडक इतकी जोरात होती की बचावाची कोणतीही संधी त्यांना मिळाली नाही. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी जमली होती. दरम्यान, पिकअप वाहनाचा चालक अपघातानंतर गाडीतून उडी मारून फरार झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. त्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं आहे. पोलिसांनी फरार चालकाचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर नवीन बोगद्याजवळ भीषण अपघात, गाडीवर कंटेनर उलटला; तिघांचा जागीच मृत्यू
कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर
घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अपघाताचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून वेग आणि निष्काळजीपणा हे प्राथमिक कारण असावं, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या भीषण घटनेमुळे ओतूर परिसरात शोककळा पसरली असून मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
Pune Crime: पुण्यात 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; शाळेतून आला, खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पण नंतर थेट बॉडी आढळली!
मोटरमन स्टेशनच विसरला
सातत्याने विलंबाने धावणारी मध्य रेल्वेची वातानुकूलित (एसी) लोकल आता निश्चित फलाट थांबा ओलांडल्याने पुन्हा चर्चेत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून निघालेली कल्याण एसी लोकल मंगळवारी भांडुप स्थानकात पोहोचताना निश्चित थांबा ओलांडून दोन डबे पुढे जाऊन थांबली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
