• Mon. Nov 25th, 2024

    डोंबिवलीत धक्कादायक घटना, रेल्वे ट्रॅकवरुन चालताना महिलेवर कैचीने वार; मंगळसूत्र-मोबाईल चोरीला

    डोंबिवलीत धक्कादायक घटना, रेल्वे ट्रॅकवरुन चालताना महिलेवर कैचीने वार; मंगळसूत्र-मोबाईल चोरीला

    डोंबिवली : रेल्वे प्रवास करून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून जाणाऱ्या एका महिलेचा चोरट्याने पाठलाग करत अचानक तिच्यावर कैचीने वार करून गळ्यातील मंगळसूत्र , कानातील डुल आणि मोबाईल असा मुद्देमाल पोबारा केला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात त्या चोरट्या विरोधात विविध कालमानुसार गुन्हा दाखल करताच दागिने घेऊन धूम ठोकणाऱ्या चोरट्याला गस्तीवरील रेल्वे पोलिसांनी काही वेळातच गजाआड केले आहे. लालबहादूर बाकेलाल यादव (वय २४, रा. पीएनटी कॉलनी , डोंबिवली पूर्व ) असे अटक चोरट्याचे नाव आहे.

    लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार प्रवासी संध्या नागराळ (वय ५४) या बदलापूर पूर्वेकडील चिंतामण चौकात असलेल्या एका इमारतीत कुटूंबासह राहतात. त्या डोंबिवलीत काही कामनित्ताने ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास बदलापूरहुन आल्या होत्या. त्यानंतर लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानकातून कोपर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करून त्या कोपर रेल्वे स्थनाकात उतरून ईस्टच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळावरून इच्छित स्थळी जाण्यासाठी रेल्वे रुळावरून पायी जात होत्या. त्यावेळी रात्री ८ वाजून ५२ मिनिटाने त्यांचा अनोखळी चोरट्याने पाळत ठेवून अचानक संध्या यांच्यावर कैचीने वार करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र , कानातील डुल आणि महागडा मोबाईल असा मुद्देमाल हिसकावून पळून गेला.

    तुझी आमच्या सावलीला उभं राहण्याची लायकी नाही, सासरच्यांकडून जातीवाचक टिप्पणी, बदलापुरातील तरुणाचं टोकाचं पाऊल

    याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात संध्या नागराळ यांच्या तक्रारीवरून अनोखळी चोरट्या विरोधात भादंवि कलम ३९५, १४, प्रमाणे गुन्हा दाखल केला. दरम्यान गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी तातडीने चोरट्याचा शोध घेण्यास हालचाली सुरू करताच कोपर स्थनाकानजीक रेल्वे रुळावर गस्तीवर असलेल्या लोहमार्ग पोलिसांनी त्याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन अटक केली आहे.

    या संदर्भात या गुन्ह्याचा तपास करणारे लोहमार्ग पोलीस कर्मचारी निंलगेकर यांच्याशी संपर्क साधला असता, चोरटा लालबहादूर याला गुन्हा घडल्यापासून काहीवेळातच अटक केली असून त्याने अश्या प्रकारे आणखी काही गुन्हे केलेत का? याचा तपास सुरू केला आहे. तर (आज) ४ नोव्हेंबर रोजी अटक आरोपीला रेल्वे न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *