• Sat. Sep 21st, 2024
सलाम! आदिवासी महिलेच्या बाळासाठी डॉक्टर अन् नर्स झाले आजी-आजोबा, रुग्णालयातच झालं नामकरण

अमरावती : लहानसहान चुकीसाठी डॉक्टरांच्या अंगावर जाऊन रुग्णालयाची तोडफोड करण्याची घटना घडत घडतात. अशातच अमरावतीत डॉक्टर आणि नर्सेसनी आपल्या मुलीप्रमाणे आदिवासी महिलेची प्रसूती करून तिच्या बाळाचे धुमधडाक्यात केलेले नामकरण सोहळा सध्या विदर्भात चर्चेचा विषय ठरला आहे. अज्ञात अनोळखी आदिवासी महिलेला मुलीसारखे प्रेम देऊन तिच्या गोंडस बाळाचे नाव रूपवीर ठेवत डॉक्टर व नर्स यांनी आजी-आजोबाची कर्तव्य पार पाडल्याचा सुखद प्रसंग आज अमरावती येथे घडला.

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जळित वॉर्डात जळालेल्यांच्या आर्त किंकाळ्या आणि प्रचंड वेदनांचा हुंकार भरलेला असतो. मात्र आज या वॉर्डाचे रूपडे पालटले होते. रांगोळी, फुलांची सजावट, फुग्यांचे डेकोरेशनने संपूर्ण वॉर्ड सजविण्यात आला. उपचार घेत असलेल्या महिला रुग्णाच्या प्रसूती पश्चात तिच्या बाळाचा नामकरण समारंभ येथे पार पडला.
चुंबकाद्वारे काढली फुप्फुसातील सुई, दिल्लीतील ‘एम्स’मधील घटना
धारणी तालुक्यातील गर्भवती बबली उईके (३०) हिला ३ ऑक्टोबर रोजी दुचाकीच्या गरम सायलेन्सरखाली हात भाजल्याने बेशुद्धावस्थेतच अचलपूर येथून आणले. त्याच दिवशी तिला प्रसूतीकळा सुरू झाल्या. इर्विनमध्ये जळित वार्डात शनिवारी तज्ञ डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी यांच्या उपस्थितीत नामकरण सोहळा झाला.

प्रसूती विभाग नसल्याने तिला डफरीन रुग्णालयात हलविण्याच्या हालचाली सुरू होत्या. परंतु, परिचारिका सरोज कराळे आणि रूपाली राऊत यांनी या वॉर्डातच प्रसूतीचा निर्णय घेतला. बबलीने गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर एक महिना ती रुग्णालयातच दाखल होती. त्यामुळे अधिपरिचारिका मनीषा कांबळे, नंदा पाढेण यांनी बाळाच्या नामकरण सोहळ्यासाठी वॉर्डाची साजसज्जा केली. नावसुद्धा तुम्हीच ठेवा, असा आग्रह बबलीने केला. प्रसूती रूपाली यांनी केल्याने ‘रूपवीर’ नाव ठेवले. यावेळी सीएस डॉ. दिलीप सौंदळे सह अनेक डॉक्टर उपस्थित होते.

अनोळखी अपरिचित असलेली आदिवासी महिला बबली तिची प्रसूती करून संवेदनशीलतेचा परिषदेत डॉक्टरांनी केलेल्या कृतीचे सध्या पश्चिम विदर्भात जोरदार कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्याला महाराष्ट्र टाईम्सचाही सलाम!!

याबाबत महाराष्ट्र टाईम सोबत बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे म्हणाले की, ‘संबंधित महिला आदिवासी भागातून रुग्णालयात भरती झाली होती. बबली आणि तिची दोन्ही महिला सोबत कुणीही पुरुष नसताना आमच्या टीमने त्यांना एका कुटुंबाप्रमाणे सेवा दिली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा आम्हाला समाधान देणार आहोत. डॉक्टर या नात्याने आम्ही कायमच रुग्णांच्या सेवेत असतो’

जळगावातील तृतीयपंथीयांचे राज्यस्तरीय उपोषण सुटले; मागण्या पूर्ण करणार, पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे आश्वासन!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed