• Mon. Nov 25th, 2024

    माझ्या हयातीत मुलगा CM व्हावा, अजित पवारांच्या आईचं वक्तव्य, दिलीप वळसे-पाटलांची सावध भूमिका

    माझ्या हयातीत मुलगा CM व्हावा, अजित पवारांच्या आईचं वक्तव्य, दिलीप वळसे-पाटलांची सावध भूमिका

    मंचर,पुणे: राज्याची निवडणूक आणि गाव पातळीवरची निवडणूक यात खूप फरक आहे. त्यामुळे या निवडणुकीशी जोडणे त्याला योग्य नाही, असे वक्तव्य राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. राज्यातील २,३६९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी विचारणा करण्यात आली. मात्र, त्यांनी या विषयावर बोलणे टाळले. आपण सध्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबत बोलू, अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

    निरगुडसर येथे मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. यावेळी वळसे पाटील यांची कन्या पूर्वा वळसे पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी वळसे पाटील म्हणाले की, आंबेगाव तालुक्यात शरद पवार गट सक्रिय नसल्याचे कारण राज्याची आणि गावची निवडूक यात खूप फरक आहे. त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही. तसेच ओबीसी प्रश्नासंदर्भात जो महत्वाचा निर्णय करायचा आहे, तो सुप्रीम कोर्टात आहे, त्याचा निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय घेणे अवघड आहे. म्हणून त्या निवडणुका थांबलेल्या आहेत, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

    आता माझे शेवटचे दिवस उरलेत, दादाने माझ्यादेखत मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं; अजितदादांच्या आईने स्पष्टच सांगितलं

    अजित पवार यांच्या आईने रविवारी सकाळी प्रसारमाध्यमांसमोर भावना व्यक्त करताना आपला मुलगा माझ्या हयातीत मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला म्हणून त्या बोलल्या. त्यांनी स्वतः हे सांगितलेले नाही. अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत ते म्हणाले की, आपण सध्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बोलू या, अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली आहे. निरगुडसरचे नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून मला मतदान करतात. त्यामुळे त्यांना मतदान करणे हा माझा हक्क असल्याचे त्यांनी सांगितले. आंबेगाव तालुक्यात ३० ग्रामपंचायतीपैकी ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित ग्राम पंचायतीसाठी मतदान होत आहे. यात वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

    ‘मी पुन्हा येईन’ नंतर पुण्यात झळकले ‘भावी मुख्यमंत्री फक्त अजित पवार’ असे बॅनर

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed