• Sat. Sep 21st, 2024

सासरच्या मंडळींच्या जाचामुळे आंतरजातीय लग्न करणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं, बदलापूर हादरलं

सासरच्या मंडळींच्या जाचामुळे आंतरजातीय लग्न करणाऱ्या तरुणाने आयुष्य संपवलं, बदलापूर हादरलं

बदलापूर : ‘माझी चुकी नव्हती मी ‘या’ जातीत जन्माला आलो’; असे सुसाईट नोटमध्ये लिहून आंतरजातीय प्रेमविवाहा करणाऱ्या एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या सुखकर्ता इमारतीत घडली आहे. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे, अनुसूचीत जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार पत्नीसह सासरच्या ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नी, अंकिता यश गायकवाड, सासरा नागप्पा पुजारी , सासू शकुंतला, मेव्हणी प्रियंका आणि तिचा नवरा तसेच आर्वेश पुजारी , व सागर अशी गुन्हा दाखल झालेल्या ७ आरोपींची नावे आहेत. तर यश संजय गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार अंजली गायकवाड ह्या मृत तरुणाच्या आई असून त्या अनुसूचित जातीच्या आहेत. त्या मृत मुलासह बदलापूर पूर्व परिसरात असलेल्या सुखकर्ता इमारतीत १५ वर्षांपसून राहतात. तर मृतक यश हा मुंबई एअरपोर्ट येथे नोकरीला होता. त्यातच गेल्या ७ ते ८ महिन्यापूर्वी कुर्ला भागात राहणाऱ्या अंकिता या तरुणीशी ओळख होऊन दोघात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मात्र, या प्रेमाला अंकिताच्या घराचा विरोध होता. त्यामुळे अंकिताकडून मृत यशचा मोबाईल नंबर मिळवून त्याला अंकिताच्या घरच्यांनी जातीवाचक शिवीगाळ करून तू आमच्या सावलीत राहणाच्या पण लायकीचा नाही, असे बोलून त्याचा अपमान केला. मात्र, तरीही अंकीता त्याला आईवडिलांच्या चोरून लपून भेटत होती. त्यानंतर तिनेच त्याला लग्नासाठी होकार देत, लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने दोघांनी नाशिक येथे जाऊन जून २०२३ मध्ये लग्न करून पुन्हा बदलापुरात राहण्यास आले.

मुंबईकरांनो सावधान! सेक्सटॉर्शनच्या प्रकरणांमध्ये वाढ, एक चूक पडेल महागात, कशी घ्याल खबरदारी?

आपल्या मुलीने खालच्या जातीच्या तरुणाशी विवाह केल्याचा राग सासरच्या मंडळीचा होता. मात्र त्याला गोड बोलून सासरी बोलवून त्याचा वेळोवेळी जातीवाचक बोलून अपमान करीत होते. त्यातच काही दिवसांनी पत्नी अंकिता हिनेही आई वडिलांची साथ देत, पती यशचा मानसिक छळ सुरू केल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तो पत्नीला भेटण्यासाठी गेला असता, त्याला सासरच्या मंडळीकडून अपमानास्पद वागणूक देऊन ‘तू मर्द असशील तर घरी येशील नाहीतर आम्ही तुला #$* समजू’ असे बोलल्याने मृत यश पत्नीसह सासरच्या मंडळीकडून त्रासलेला होता. त्यानंतर त्याने याच नैराश्यातून २८ ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने ४ पानाची सुसाईट नोट लिहून ठेवली होती.

धक्कादायक…! भाजीवरून बायकोसोबत वाद; आईच्या मध्यस्थीने मुलगा संतापला, अन् नको ते करून बसला

या घटनेनंतर २९ ऑक्टोंबर रोजी मृतकाच्या आईच्या तक्रारीवरून बदलापूर पोलीस ठाण्यात पत्नीसह ७ जणांवर भादंवि कलम ३०६, ३४, सह अनुसूचीत जाती जमाती प्रतिबंध कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा दखल करण्यात आला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता, मृतकच्या आईच्या तक्रारीवरून तसेच सुसाईट नोटच्या आधारे ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून २ नोंव्हेबर रोजी आरोपी पत्नी आणि सासरा यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच इतर पाच आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. यापैकी एक अल्पवीयन असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed