• Mon. Nov 25th, 2024

    रक्ताळलेल्या पायानं हजारो शेतकरी चालत आहेत,कधीही उद्रेक होईल, राजू शेट्टींचा इशारा

    रक्ताळलेल्या पायानं हजारो शेतकरी चालत आहेत,कधीही उद्रेक होईल, राजू शेट्टींचा इशारा

    कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांची गेल्या आठ दिवसांपासून उसाला दुसरा हप्ता चारशे रुपये मिळावा या मागणीसाठी आक्रोश पदयात्रा सुरू केली आहे. शिवाय चारशे रुपये दर दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करून देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. साखर कारखाने आणि सरकार आणि विरोधक कोणीच याची दखल घेत नसल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल शिरोळ येथे घोडावत जॉगरी कारखान्याची उसाची वाहतूक सुरू असताना निमशिरगाव येथे ट्रॅक्टर पेटवून दिला आहे. दरम्यान, या घटनेनंतर राजू शेट्टी यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, असं आवाहन केलं आहे.

    मागील ऊस हंगामातील दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे गेल्या आठ दिवसांपासून आक्रोश पदयात्रा काढत आहेत. राजू शेट्टी यांची ही आक्रोश पदयात्रा १७ ऑक्टोबर पासून सुरू असून एकूण २२ दिवस ही पदयात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ कारखान्यांवर जात आहे. राजू शेट्टी स्वतः तब्बल ५२२ किलोमीटर चालत असून गेल्या वर्षीचे ४०० रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला होता.मात्र या आंदोलनाची दखल कारखानदार सत्ताधारी आणि विरोधक कोणीही घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल घोडावत जॉगरी कारखान्याचे ऊस वाहतूक करणारे ट्रेलर पेटवून दिले.

    ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड रेकॉर्डसह रचला इतिहास, नेदरलँड्सच्या संघावर साकारला सर्वात मोठा विजय
    शेतकरी कडक उन्हात रक्तबंबाळ पायाने हजारो किलोमीटर चालत आहेत. मात्र याची दखल ना कारखानदारांनी घेतली, ना शासनाने घेतली , ना कथाकथित विरोधी पक्ष घेतोय, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. तसेच राजकारण म्हणून तरी विरोधी पक्षाने शेतकऱ्यांची बाजू घ्यायला हवी होती. मात्र विरोधी पक्षांच्या नेत्यांचे ही साखर कारखाने आहेत.यामुळे विरोधी पक्ष देखील या आंदोलनाची दखल घेत नाहीत. सत्ताधारी विरोधक आणि साखर कारखाने या सर्वांना मिळून शेतकऱ्यांचे पैसे बुडवायचे आहेत, अशी भावना ऊस उत्पादकांच्या मुलांची झाल्याचा असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांनी अजूनही संयमाने आंदोलन करण्याचे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे. मात्र, सरकार आणि कारखानदारांनी तात्काळ हा प्रश्न सोडवावा अन्यथा केंव्हाही आंदोलनाचा उद्रेक होईल, असा इशाराही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
    डेव्हिड वॉर्नर सेलिब्रेशन करताना का देतो ‘पुष्पा’ची पोझ, जाणून घ्या खरं कारण…

    कशी आहे आक्रोश पदयात्रा ?:

    स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू असून २२ व्या ऊस परिषदेच्या पार्श्वभूमीवर तब्बल २२ दिवस हे आत्मक्लेष आंदोलन चालणार आहे. आंदोलनाची सुरुवात १७ ऑक्टोंबर पासून शिरोळ येथील दत्त सहकारी साखर कारखाना येथून सुरू झाली असून पुढे गुरूदत्त, जवाहर, शाहू, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना, संताजी घोरपडे, बिद्री, भोगावती, कुंभी कासारी, दालमिया, वारणा, बांबवडे, चिखली, निनाईदेवी, वाटेगाव, कृष्णा, राजारामबापू, जी डी बापू लाड, वाळवा हुतात्मा, सांगली सहकारी, सर्वोदय, शरद, पंचगंगा साखर कारखाना करत तब्बल ५२२ किलोमीटर अंतर चालून ऊस परिषदेला पोहोचणार आहे.
    जुन्नरमध्ये शरद पवारांची पुन्हा एन्ट्री होणार, सत्यशील शेरकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार?
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed