• Mon. Nov 25th, 2024

    कायंदेंकडून फोटो दाखवत आरोप, आव्हाडांनी थेट फडणवीसांच्या टेबलावरचा ‘तो’ प्रसंग सांगितला!

    कायंदेंकडून फोटो दाखवत आरोप, आव्हाडांनी थेट फडणवीसांच्या टेबलावरचा ‘तो’ प्रसंग सांगितला!

    मुंबई : शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर सनसनाटी आरोप केले आहेत. जितेंद्र आव्हाड यांचा संशयित ड्रग्स तस्करांशी संबंध असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. तसेच अनेक संशयित ड्रग्स तस्करांसोबत असलेले आव्हाड यांचे फोटोही त्यांनी माध्यमांना दाखवले. मनीषा कायंदे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोपांचा बॉम्ब फोडला.

    मनीषा कायंदे यांचे सनसनाटी आरोप

    “नाशिकमध्ये अमली पदार्थ तस्करी प्रकरणात ललित पाटील या आरोपीला पोलिसांनी अटक केली. त्यावेळेस २०२० मध्ये ललित पाटील हा उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ते असल्याचं समोर आलं, कदाचित तो अजूनही असेल. त्याच्या हातामध्ये शिवबंधन बांधलेले असल्याचे फोटो देखील आपण पहिला. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आणखी सात-आठ नावे समोर आली. ज्यात सलमान फाळके हे मोठे नाव होते, ज्याच्याकडे ५४ ग्राम एमडी ड्रग्ज सापडले होते. या सलमान फाळके सोबत ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्यासोबत, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळेयांच्यासोबत काढलेले फोटो मला मिळाले आहेत”.

    औषधांच्या नावाने ड्रग्ज पुरवणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात, राहत्या बंगल्यातून कोकेन अन् एमडी जप्त
    “आमच्या दादा भुसे, शंभूराज देसाई या मंत्र्यांवर उठसूठ तथ्यहीन आरोप करणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी अमली पदार्थ तस्करीत आरोपी असणाऱ्यांसोबत फोटो कसे काढले, त्या आरोपीसोबत त्यांची जवळीक कशी, असे सवाल विचारत जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण द्यावे”, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केलीये.

    अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अटक झालेली मंडळी कोणाच्या जवळची आहेत, कोणाशी संबंधित आहेत, त्यांना कोणाचं प्रोत्साहन, राजकीय पाठबळ आहे का? हे तपासायला हवे. यासाठी याठिकाणी काही फोटो दाखवते, असं म्हणत मनीषा कायंदे यांनी सलमान फाळके, शानू पठाण (ठाणे महानगरपालिका, विरोधी पक्षनेते) यांचे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंसोबतचे फोटो दाखवले.

    ड्रग्ज तस्कर ललित पाटीलची मैत्रीण प्रज्ञा कांबळे हिच्याबद्दल धक्कादायक माहिती उघड
    जितेंद्र आव्हाड यांचे कायंदेंना उत्तर

    मराठी भाषेत टिंबाला किती महत्त्व आहे ते कायदे आणि कायंदे यांच्या मध्ये जितका फरक आहे तितकाच मोठा… आज कुणीतरी पत्रकार परिषदेत आरोप केले की ड्रग्स माफियाशी सबंध आहे वगैरे वगैरे… कदाचित आपण विसरलात … मी पहिला असा लोकप्रतिनिधी असेल ज्याने विधानसभेत ह्या सगळ्या विरोधात आवाज उचलला… सातत्याने ह्या विरोधात आवाज उचलतो आहे. माझे ट्विट पहा, माझी भाषणे ऐका … आणि यापैकी काहीएक जमतच नसेल तर बिनबुडाचे आरोप तरी करू नका…

    पूर्वी MD हा ड्रग्ज नार्कोटेक्समध्ये घेतला जात नव्हता. त्यामुळे पोलिसांनी जरी MD पकडला तर आरोपीला ताबडतोब सोडावं लागत असे. मी जेव्हा विरोधी पक्षामध्ये होतो तेव्हा मी अर्धा किलो MD त्यावेळेसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलावर नेऊन ठेवलं आणि याचे दुष्परीणाम काय होतात हे विधानसभेत मांडले. त्यानंतर MD हा नार्कोटेक्समध्ये घेऊन कारवायांना सुरूवात झाली. तेव्हा माझी याच्यातील भूमिका काय आहे हे मला समजावून सांगण्याची गरज नाही, अशी फेसबुक पोस्ट करून आव्हाड यांनी आमदार कायंदेंना उत्तर दिलं आहे.

    तपास करा, ललित पाटलाचे धागेदोरे संजय राऊतांपर्यंत; संजय गायकवाडांचे आरोप

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed