• Mon. Nov 25th, 2024

    कोल्हापूर लोकसभेची जागा एक, मविआचे तीन दावेदार, उमेदवार कोण असणार? दिग्गज नेते काय करणार ?

    कोल्हापूर लोकसभेची जागा एक, मविआचे तीन दावेदार, उमेदवार कोण असणार? दिग्गज नेते काय करणार ?

    कोल्हापूर : कोल्हापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय दृष्ट्या महत्वाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात जिल्ह्यावर सतेज पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आपल वर्चस्व ठेवलं आहे. शिवाय २०१९ नंतर महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे दोन्ही खासदार आणि सर्व आमदार महाविकास आघाडीचे झाल्याने भाजप जिल्ह्यात कमकुवत झाली होती. मात्र, भाजपने धनंजय महाडिक यांना राज्यसभेची उमेदवारी देत खासदार केलं. शिवाय शिवसेनेमध्ये झालेल्या बंडानंतर विद्यमान दोन्ही खासदार हे शिंदेसोबत युतीमध्ये सामील झाले आणि आता अजित पवार गटासोबत मंत्री हसन मुश्रीफ गेल्याने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी सक्षम आणि ताकदवन उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

    राज्यात झालेल्या राजकीय भूकंपाचे धक्के कोल्हापूरला देखील बसले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापूर आणि हातकणंगले हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होते. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडानंतर दोन्ही खासदार शिंदे सोबत गेल्याने आगामी २०२४ च्या निवडणूकीत दोन्ही जागांवर शिवसेनेने आपला दावा सांगितला आहे. काँग्रेस देखील लोकसभेची एक जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. तर दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभानिहाय आढावा बैठकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी ही दोन्ही जागांवर दावा सांगत उमेदवारी कोणाला द्यायची हे देखील सांगितले आहे.

    तिन्ही प्रमुख पक्षांकडून दावा :
    सद्यस्थितीत महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षानी या दोन्ही मतदारसंघांवर आपला दावा सांगितला असला तरी ताकतीचा उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीला उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. जर केवळ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर, २०१९ च्या निवडणुकीत कोल्हापुर मतदारसंघात सतेज पाटलांच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक निवडून आले…मात्र ते आता शिंदे सोबत गेल्याने येथे महविकास आघाडी चा उमेदवार कोण असेल असा प्रश्न पडला आहे…

    शिवसेना ठाकरे गटाची सद्यस्थिती:

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार संजयबाबा घाटगे इच्छुक आहेत. ते उद्धव ठाकरे यांच्या जवळचे आणि शिवसेनेशी एकनिष्ठ अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी लोकसभेच्या अनुषंगाने तयारी देखील सुरू केली आहे. मात्र ते हसन मुश्रीफ यांच्या जवळ चे ही मानले जातात. काही दिवसांपुर्वी हसन मुश्रीफ यांची साथ असेल तर लोकसभा आपण जिंकू असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला होता. मात्र मुश्रीफ आता महायुती मध्ये गेल्याने मुश्रीफ त्यांना साथ देणार हे धूसरच आहे.

    काँग्रेसमध्ये दोन्ही नेत्यांना इच्छा नाही :

    काँग्रेसला देखील कोल्हापूरची एक जागा लढवण्याची इच्छा असली तरी उमेदवार मिळत नसल्याने अद्याप उमेदवारी कोणाला द्यायची हेच ठरत नाहीय… येथे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील आणि आमदार सतेज पाटील (विधानपरिषद) यांच्या नावाची चर्चा सुरू असली आहे. आमदार पी. एन. पाटील हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख असून दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवावी अशी इच्छा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आहे. आमदार सतेज पाटील यांचं जिल्ह्यात असलेलं वर्चस्व पाहता काँग्रेस हायकमांडकडून सतेज पाटील यांना उमेदवारी द्यावी असा विचार सुरू आहे. मात्र, दोघांनाही लोकसभा लढवण्याची इच्छा नसल्याने लोकसभेचा चेंडू दोघेही एकमेकांकडे टाकत आहेत…
    शमीच्या एका चेंडूने सामना भारताच्या बाजूने फिरला, मिचेलच्या शतकानंतरही न्यूझीलंडच्या धावांना ब्रेक
    शरद पवार गटाला मोठा संघर्ष करावा लागणार :

    एका बाजूला शिवसेना आणि काँग्रेसमध्ये हे चित्र असताना गेल्या काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्याफुटी नंतर कागलपूरती मर्यादित असलेली राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित दादांसोबत गेल्याने शरद पवार गटाला मोठा संघर्ष करावा लागणार आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे पार पडलेल्या लोकसभा निहाय आढावा बैठकीत पदाधिकार्यानकडून आघाडी काळात ही जागा राष्ट्रवादी ची असल्याने ही जागा सोडू नये असे सांगत… अजित पवार गटासोबत जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील गेल्याने शरद पवार गटाची जिल्हाध्यक्ष पदाची माळ गळ्यात पडलेल्या व्ही. बी. पाटील यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

    व्ही. बी. पाटील हे उद्योजक असून जिल्ह्यातील अनेक संस्थेत ते पदाधिकारी आणि संचालक आहेत. तर शरद पवार आणि छत्रपती घराण्याची त्यांचे निकटचे संबंध आहेत. मात्र, लोकसभा आणि विधानसभा कोणतीही निवडणूक लढवण्याचा अनुभव त्यांच्याकडे नसल्याने त्यांना कितपत यश मिळेल हा विचार करण्याची गोष्ट आहे…
    रोहित जे बोलला ते करून दाखवलं, न्यूझीलंडच्या सामन्यापूर्वी नेमकं काय वक्तव्य केलं होतं पाहा….
    महायुती मध्ये ही उमेदवारी संदर्भात संभ्रम

    महायुतीकडून संजय मंडलिक यांनाच उमेदवारी मिळेल असा विश्वास शिंदे गटाला असला तरी भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेनुसार संजय मंडलिक यांच्या विरोधात वातावरण रिपोर्ट भाजपकडे आल्याने भाजप येथे आपला दुसरा उमेदवार देईल असेही राजकीय विश्लेषकांकडून बोललं जात आहे. सध्या तिघांकडून देखील इच्छा व्यक्त करण्यात आली असली तरी जागा वाटपानंतर ही जागा कोणाला जाईल आणि कोण उमेदवार असेल हे स्पष्ट होईलच… मात्र महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल याबाबत तुम्हाला काय वाटत हे नक्की कळवा…

    INDvsNZ: शमीचे घातक यॉर्कर; विकेट हवेत उडाली, डॅरिल मिशेलचा काटा काढला; अशी कामगिरी करणारा पहिलाRead Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed