Mumbai Airport : विमानतळाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही त्यांना अपेक्षित मदत केली नाही, असाही नातेवाईकांचा आरोप आहे.
कोईम्बतूर येथून सुमारे २५ जणांचा समूह वाराणसीला जायला निघाला होता. सोमवारी ११.४०च्या सुमारास मुंबईला विमान उतरल्यानंतर सुंदरम स्वच्छतागृहाच्या दिशेने जात होत्या. स्वच्छतागृहाबाहेरच असलेल्या पाण्यावरून घसरून त्या पडल्या, अशी तक्रार त्यांचे नातेवाईक राजशेखर व्यंकटरमण्णा यांनी केली. त्यांनी आपल्या मुलाशी संपर्क साधला.
Indian Railway: रेल्वेतील खाद्यसेवा स्थगित होण्याची भीती; IRCTCच्या मुंबईतील किचनमध्ये गॅस तुटवडा
काही वेळाने तेथे दोन कर्मचारी आले, मात्र सुंदरम यांना बसताही येत नसल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते, ते झाले नाही असे व्यंकटरमण्णा म्हणाले. त्यांना एका बाजूला बसवण्यात आले. तिथे अधूनमधून काही जण येऊन विचारत होते, मात्र अपेक्षित वैद्यकीय मदत मिळाली असती तर त्यांच्या वेदना कमी झाल्या असत्या. संध्याकाळी सहाच्या सुमारास विमानतळावरील ओळखीच्या मदतीने त्यांना विलेपार्ले येथील एका खासगी रुग्णालयामध्ये नेण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करेपर्यंत संध्याकाळचे ७ वाजून गेले होते. त्यांचे नातेवाईक रात्री उशिरा मुंबईत पोहोचले. त्यानंतर उपचारांना वेग आला.
Sunetra Pawar Emotional : कापरा आवाज, शेजारच्या आदिती तटकरेंच्याही डोळ्यांत अश्रू, सुनेत्रा पवार विधान परिषदेत भावूक
मुंबईमध्ये उपचार मिळण्यासाठी विमानतळ आणि विमानकंपनी या दोन्हीकडून अपेक्षित मदत न झाल्याने त्यांना मंगळवारी सकाळी रुग्णवाहिकेमधून कोईम्बतूर परत नेण्यात आले. सोमवारी रात्री मुंबईत दाखल झाल्यानंतर मंगळवारी सकाळी तातडीने सुंदरम यांना कोईम्बतूर हालवण्यात आल्याने या प्रकरणी पोलिस तक्रार करण्यासाठी वेळ मिळाला नाही, असे व्यंकटरमण्णा यांनी स्पष्ट केले. या संदर्भात विमानतळाने सीसीटीव्ही फुटेज दाखवावे असे आवाहन त्यांनी केले. सुंदरम यांच्यावरील वैद्यकीय उपचार नीट सुरू झाल्यानंतर पोलिस तक्रार करण्याचा विचार करण्यात येईल असेही ते म्हणाले.
Jayant Patil: शेतकरी कर्जमाफी अन् पायाभूत सुविधा दोन्ही फसव्या; जयंत पाटलांची राज्याच्या अर्थसंकल्पावर टीका
विमानतळाकडून प्रतिक्रिया देण्यास नकार
या प्रकरणी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे सातत्याने विचारणा करून तसेच त्यांच्या प्रवक्त्यांशी संवाद साधूनही मंगळवारी रात्रीपर्यंत प्रतिक्रिया देण्यास नकार देण्यात आला.
