होळकर हे लासलगाव येथील मराठा तरुण नेतृत्व असून, सरपंच ते लासलगाव बाजार समितीच्या सभापतीपदापर्यंत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. मंत्री भुजबळ हे येवला मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीत असल्यापासून होळकर भुजबळांचे समर्थक आहेत. लासलगाव बाजार समितीच्या निवडणुकीत होळकर यांनी भुजबळांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे नेतृत्वही केले आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ हे आरक्षणाला विरोध करीत असल्याची भावना असल्याने त्यांना मराठा समाजाकडून विरोध होत आहे. त्यातून होळकर यांनी भुजबळांची सोडली आहे.
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांनी येवला येथील सभेत मराठा समाजाबाबत मांडलेली भूमिका योग्य असल्याचे होळकर यांनी माध्यमांना सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व पदांचा आपण राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. दरम्यान, भुजबळ यांनी शरद पवार यांना सोडल्यानंतर पवारांच्या येवला येथील सभेला होळकर यांनी व्यासपीठावर हजेरी लावली होती. होळकर बाजूला झाल्याने भुजबळांना लासलगावमध्ये मतांची गोळाबेरीज करणे अवघड होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
जनता माझ्यासोबत- भुजबळ
या घटनांमागील कारणे ही दाखविण्यासाठी असतात. आगामी काळात जिल्हा परिषदेचीही निवडणूक लागणार आहे. आपले काय होणार ? याची काळजी लोकांना असते. भुजबळ हे स्वत: शिवसेना-भाजपासोबत अजित पवारांच्या गटात काम करतात. मग आपले पुढे काय ? अशी काळजी अनेकांना सतावते. परंतू , येवला आणि लासलगांव येथील जनता माझ्यासोबत आहे. तोपर्यंत माझे काम सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News