• Sat. Sep 21st, 2024
बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी जाताना अनर्थ घडला, भीषण अपघातात बापलेकासह एकाचा करुण अंत

जालना : जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारातील निरंकारी पेट्रोल पंपाजवळ काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटरसायकल आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात ३ जण जागीच ठार झाले आहेत. बाईक क्र. एमएच २१ बीझेड ०४५३ वरील बापलेक आणि आणखी एक जण जागीच ठार झाले आहेत. ज्ञानेश्वर साहेबराव साबळे (वय ३८), युवराज ज्ञानेश्वर साबळे (वय १३, दोघे रा. निकळक) आणि आत्माराम कारभारी म्हसके (वय ३०, रा. अकोला ता. बदनापूर) असं तिघा मृतांचे नावे आहेत.

ट्रॅक्टर क्र. आरजे १४ आरबी ४४५२ बाईकला धडकल्याने हा भीषण अपघात घडल्याची माहिती समोर येत असून यात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. अपघात इतका भयानक होता की बाप लेकाचे शिर अक्षरशा: धडावेगळे झाले. परिसरतील नागरिकांनी घटनेची माहिती बदनापूर पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांच्या आणि जेसीबीच्या सहाय्याने मृतांचे शव ट्रॅक्टर खालून काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे पाठवले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे बदनापूर तालुक्यातील अकोला आणि निकळक या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येतेय.

भाजपसाठी धोक्याची घंटा, पुण्यात अजितदादांचा आक्रमक पवित्रा; नगरसेवकांची बैठक बोलावली!
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील निरंकारी पंपासमोर आज रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास मोटार बाईक आणि ट्रॅक्टरची समोरासमोर जबर धडक झाल्याने बाईकवरील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात बाईकचा चक्काचूर होऊन तिघेही ट्रॅक्टरमध्ये फसल्याने त्यातच तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाईकमध्ये पेट्रोल भरण्यासाठी वळण घेताच अचानक समोरून ट्रॅक्टरने धडक दिल्याने हा अपघात झाला.

सदर घटनेची माहिती मिळताच बदनापूर पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब खार्डे, रणजित मोरे सह अन्य कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तिघांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय बदनापूर येथे पाठविले. दरम्यान, ट्रॅक्टर चालक फरार झाला असून या ट्रॅक्टरला बोर मशीन जोडलेली आहे तसेच त्यावर नंबर देखील नाही. सदरचे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

आमदार अपात्रता प्रकरणातील ३४ याचिकांचं विभाजन, शिवसेनेच्या दोन्ही गटांना नार्वेकरांचे महत्त्वाचे निर्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed