अमोल मिटकरी काय म्हणाले?
आज अकोल्यात पवार साहेब आले होते मनातून आम्ही त्यांचे स्वागत केले, साहेब शेवटी आमचं दैवत आहेत. पुन्हा एकदा विश्वासाने सांगतोय २०२४ च्या निवडणुकीत विधानसभेच्या जागेवर जास्तीत जास्त उमेदवारांनी निवडून आणू आणि दादांना मुख्यमंत्री पद मिळणारच. हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर सुप्रिया ताईंच्या म्हणण्याप्रमाणे ताईंनी ‘जो’ दादांसाठी हार राखून ठेवलाय, त्यांचा भाऊ म्हणून पहिल औक्षण करायला येतील आणि त्यांचं स्वागत करतील, आणि मला विश्वास आहे अजित दादा महाराष्ट्राच स्वप्न पूर्ण करतील, असं अमोल मिटकरी म्हणाले.
बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर मिटकरी म्हणाले की अजित दादा जर मुख्यमंत्री होत असतील तर मला नाही वाटत ताई विरोध करतील. बावनकुळे साहेबांनी वैचारिक तो विषय मांडलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षापेक्षा नाती पण महत्त्वाचे आहेत. मी जर आमदार झालो तर माझ्या बहिणीला सुद्धा आनंद झाला होता. दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात जास्त आनंद सुप्रिया ताईंनाच होणार असेही ते बोलले.
शेवटी पवार कुटुंबीयांचे आशीर्वाद, शुभेच्छा, सदिच्छा दादांसोबत… :रुपाली चाकणकर
शरद पवार म्हणाले, ते स्वप्नचं!, असं काही घड़णार नाहीये. यावर रूपाली चाकणकर म्हणाल्या की सुप्रिया ताईंनी सांगितलं की दादा मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिला हार मी घालणार, म्हणजे त्या आशावादी आहेत. दादा मुख्यमंत्री व्हावे, आमचे स्वप्न आहे असे स्पष्टच चाकणकर म्हणाल्या. त्या देखील अकोल्यात बोलत होत्या. नेमक्या शुभेच्छा कोणाच्या समजाव्या असा प्रश्न त्यांना विचारला असता त्या म्हणाले की आपणच त्याचा विचार केला पाहिजे, सुप्रियाताईंनी अगोदरच पहिला हार घालण्याचं निश्चित करून ठेवलं, याची शाश्वती सर्वांना आहे. शेवटी पवार कुटुंबीयांचे आशीर्वाद, शुभेच्छा, सदिच्छा हे दादांसोबत आहे. म्हणूनच् त्यांनी पहिला हार घालणार असं सांगितलेय, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
Read Latest Maharashtra News And Marathi News