• Sat. Sep 21st, 2024

अवैध दारु विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्कचा सर्जिकल स्ट्राइक, आठ दिवसात २४२ जणांना बेड्या

अवैध दारु विक्रेत्यांवर राज्य उत्पादन शुल्कचा सर्जिकल स्ट्राइक, आठ दिवसात २४२ जणांना बेड्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे : महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने सप्ताहांतंर्गत पुणे जिल्ह्यात घेतलेल्या अवैध दारु विक्रीप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने २८४ गुन्हे नोंदवून त्यातील २४२ आरोपींना अटक केली आहे. तसेच एक कोटी १९ लाख ५१ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

उत्पादन शुल्क आयुक्त विजय सुर्यवंशी, संचालक सुनील चव्हाण तसेच विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांच्या आदेशानुसार जिल्ह्याचे अधीक्षक चरणसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. एक ते आठ ऑक्टोबर दरम्यान ही कारवाई मोहीम राबविण्यात आली होती. त्यानुसार, जिल्ह्यातील सासवड, तळेगाव दाभाडे, दौंडसह अन्य भागांमध्ये अवैधरित्या परवाना नसताना देशी तसेच परदेशी दारुची विक्री करीत असल्याचे छाप्यात आढळले. त्यानुसार दारु जप्त करण्यात येऊन संबंधित विक्रेत्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
मातृत्त्वाचा सन्मान, महिलांप्रती आदर,शिवीमुक्त कट्टा सांगलीकरांचा अनोखा उपक्रम,स्वातंत्र्य दिनापासून अभियान
‘मोहिमेत १५ हजार ४७२ लिटर गावठी दारू तसेच ४७१ लिटर, बिअर, ताडी आणि परराज्यातील दारुसह दारु निर्मितीचे रसायनही जप्त करण्यात आले आहे. एकूण एक कोटी १९ लाख ५१ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विक्रेते वारंवार अवैध दारु विक्री करीत असल्याचे आढळल्याने महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ कलम अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर पुन्हा गुन्हे करीत होते. ‘महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस अॅक्टिव्हिटी’ (एमपीडीए) या कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव देण्यात येणार आहे,’ असे उत्पादन शुल्काचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले.
अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, मनसे कार्यकर्ते संतापले, टोलनाका पेटवला
‘पुणे जिल्ह्यात १२ कार्यक्षेत्रीय पथके, दोन भरारी पथके आणि दोन विशेष पथकांसह एकूण सोळा पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. या पुढेही अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री तसेच अंमली पदार्थ विरुद्ध नियमित कारवाई सुरु राहणार आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्याही नागरिकास अवैध मद्य निर्मिती, वाहतूक, व विक्री तसेच अंमली पदार्थाबाबत माहिती मिळाल्यास त्यांनी १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा,’ असे आवाहन अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी केले.

पहिल्याच सामन्यात वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या द.आफ्रिकेला बसू शकतो मोठा झटका; वर्ल्डकप सुरू असताना होऊ शकते बंदीची कारवाई

गेल्या २५ वर्षांत प्रफुल्ल पटेलांची खदखद आमच्या कानावर कधीच आली नाही : सुप्रिया सुळे

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed