• Mon. Nov 25th, 2024

    जालन्यातील घटनेनंतर मुंबई पोलीस कमालीचे सावध; दहीहंडीच्या सुरक्षेसाठी खास प्लॅन

    जालन्यातील घटनेनंतर मुंबई पोलीस कमालीचे सावध; दहीहंडीच्या सुरक्षेसाठी खास प्लॅन

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईत पुढचे काही दिवस सणासुदीचे असून, सर्वत्र गर्दी वाढणार आहे. या परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखताना जनभावना दुखावणार नाही याची काळजी पोलिसांना घ्यावी लागणार आहे. दहीकाला उत्सवासाठी मुंबई पोलिसांनी सर्वोतोपरी सावधगिरी बाळगली असून, कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. समाजकंटकांवर कडक नजर ठेवली जाणार असली तरी जालना येथे झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर कारवाई करताना पोलिसांकडून सावध पवित्रा घेण्यात येणार आहे.

    Jalna News: जिथे पोलिसांनी आंदोलकांना बदडलं-लाठ्याकाठ्या मारल्या, तिथे जाऊन DGP साहेबांकडून पाहणी

    राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि महापालिकेपासून लोकसभेपर्यंतच्या होऊ घातलेल्या निवडणुका पाहता यावर्षी दहीहंडींची संख्या दरवर्षीच्या तुलनेत अधिक आहे. दहीहंडी साजरी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व पोलिसांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंगळवारी आणि त्याआधी याबाबत बैठका घेऊन बंदोबस्ताचे नियोजन आणि कारवाईची प्रक्रिया याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यानुसार कायदा आणि सुव्यवस्था राखणे, जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि महिलांची सुरक्षा यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या घटनेमुळे लोकांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यामुळे पोलिसही सावध झाले आहेत. याबरोबरच वाहतूक सुरळीत राहील याकडेही लक्ष दिले जाणार आहे. कोणतेही बेकायदा कृत्य करून कारवाई करण्यास भाग पाडू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Mumbai Dahi Handi: गोविंदा चाखणार लाखोंचे लोणी, आजच्या दहीहंडीत गोविंदांना मिळणार विक्रमी मलई

    पोलिसांची मोहीम

    – अश्लील हावभाव, शेरेबाजी करणाऱ्यांवर नजर

    – गर्दीमध्ये साध्या वेशात गस्त

    – मोबाइल, सोनसाखळी चोर, पाकीटमार यांच्या हालचाली टिपणार

    – ध्वनिक्षेपकाचा आवाज आणि गोविंदांच्या वयाबाबत नियमांवर बोट

    – वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही होणार कारवाई

    – सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये हुल्लडबाजी होणार नाही याची काळजी

    जालन्यात पोलिसांकडून लाठीचार्ज तर आंदोलकांकडून दगडफेक, आंदोलक अन् पोलीस जखमी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed