म. टा. प्रतिनिधी, नाशिक: राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये २० संवर्गातील तब्बल १०३८ पदांची भरती प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्हा परिषदेकडील १०३८ जागांसाठी तब्बल ६४ हजार ८० उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.
भरती प्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आयबीपीएस या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शक व काटेकोर पद्धतीने करण्यावर प्रशासनाचा भर आहे. मात्र काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभने दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी. या प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. अशी फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या भरतीसाठी कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याबाबत निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

– –
पद – पदसंख्या -अर्ज
-(कंत्राटी) ग्रामसेवक – ५०- ११,७२८
-आरोग्य सेवक (पुरुष) ४० टक्के – ८५ – – १७,५७९
-आरोग्य सेवक (पुरुष) ५० टक्के- १२६ – ६,४८८
-औषध निर्माण अधिकारी – २० – ५,०५७
-प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १४ – २,६०७
-कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ३४ – ५,२६८
-स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक- ३३ – २,९४२