• Sat. Sep 21st, 2024
Nashik News LIVE Updates : ‘नाफेड’ने ठरवलेल्या कांदे दरात कपात, शेतकरी-अधिकाऱ्यांची हमरीतुमरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : ‘नाफेड’ने निर्धारित केलेल्या कांद्याच्या दरात गुरुवारी लासलगाव बाजार समितीत अचानक कपात करण्यात आली. त्यामुळे नाराज शेतकऱ्यांची ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांसोबत हमरीतुमरी झाली. अनेक शेतकरी विक्रीसाठी आणलेला कांदा घेऊन माघारी परतले. अखेर दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर ‘नाफेड’ने दर पूर्ववत केल्यानंतर दिवसभर ठप्प झालेले लिलाव सुरू झाले.

निर्यातशुल्क लागू केल्यानंतर जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद होऊन कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. शेतकऱ्यांना कांद्याच्या दरांसाठी रस्त्यावरही उतरावे लागले. ही परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोच गुरुवारी हा प्रकार घडल्याने कांदा प्रश्नावरून शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली संतापाची धग कायम असल्याचे अधोरेखित झाले. ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी गुरुवारी बाजार समित्यांमध्ये कांदा विक्रीस आणला. जिल्ह्यात सध्या ‘नाफेड’ची ४० कांदा खरेदी केंद्रे आहेत, तर ‘एनसीसीएफ’ची २० खरेदी केंद्रे आहेत. जिल्ह्यातील या ६० खरेदी केंद्रांवर शेतकरी उत्पादक कंपन्यांद्वारे कांद्याची खरेदी सुरू आहे. ‘नाफेड’ने दिलेल्या वायद्यानुसार दोन लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला जात आहे. या कांद्याला ‘नाफेड’ने दोन हजार ४१० रुपये दर देऊ केलेला आहे.

Nashik: बळीराजाची चिंता वाढली; कोवळ्या पिकांचे मरण, नदी-नाले अन् बंधारेही कोरडेठाक

भेसळीच्या संशयावरून २५० किलो पनीर, खवा नष्ट

शहरात बनावट, भेसळयुक्त पनीर व खव्याची विक्री होत असल्याच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने देवळाली कॅम्प येथील दोन दुकानांची तपासणी केली. या कारवाईत भेसळीच्या संशयावरून ६० हजार रुपये किमतीचा २५० किलो पनीर व खव्याचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला.

देवळाली कॅम्पमधील आनंदरोड येथील जसपालसिंग प्रीतीपालसिंग कोहली यांच्या दुकानाची मंगळवारी ‘एफडीए’ने तपासणी केली असता त्या ठिकाणी अत्यंत अस्वच्छ वातावरणात पनीरचा साठा केल्याचे आढळून आले. हा कारखाना विनापरवाना पनीर उत्पादन करीत असल्याचेही आढळून आले. पनीरमधील भेसळीच्या संशयावरून अन्न नमुना विश्लेषणासाठी घेऊन उर्वरित १७१.५ किलोंचा ३७ हजार ७३० रुपयांचा साठा जप्त करून तो नाशवंत असल्याने जागेवरच नष्ट करण्यात आला.

जिल्ह्यात सर्व आमदार सत्तेत, खासदारांना निधी द्यायचा कसा, दादा भुसे चिंतेत, नेमकं प्रकरण काय?
दुसरी कारवाई देवळाली कॅम्प येथीलच प्रशांत कोंडिराम यादव या मिठाई उत्पादकाच्या दुकानावर करण्यात आली. या दुकानाची तपासणी केली असता अत्यंत अस्वच्छ वातावरणात पेढा, अंजीर बर्फी व इतर मिठाईचा साठा केल्याचे आढळून आले. भेसळीच्या संशयावरून, तसेच अनारोग्य फैलावणाऱ्या ठिकाणी उत्पादन केल्याने अन्न नमुने विश्लेषणासाठी घेऊन २१ हजार ७२० रुपयांचा ५३ किलो साठा जप्त करण्यात आला. हा साठादेखील नाशवंत असल्याने नष्ट करण्यात आला.

गणेशोत्सवाच्या निर्विघ्नतेसाठी सहकार्य करा

सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना परवानग्या मिळविताना अनेक अडचणी येतात. एक खिडकी योजनेतून या परवानग्या सहजपणे मिळायला हव्यात, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी पोलिस आयक्तांकडे केली. पोलिसांनी बोलावलेल्या मंडळ पदाधिकारी आणि शांतता समिती सदस्यांच्या बैठकीत सूचनांचा पाऊस पडला. कायदा आणि सुव्यवस्था राखून उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले.

त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांसाठी गुड न्यूज; श्रावणी सोमवारनिमित्त एसटीचा महत्त्वाचा निर्णय
येऊ घातलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि शांतता समिती सदस्यांची बैठक बोलावली होती. पोलिस मुख्यालय येथील भिष्मराज हॉलमध्ये ही बैठक झाली. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्यासह महापालिकेतील माजी नगरसेवक, राजकीय पदाधिकारी, महापालिका, महावितरण, आरटीओ, उत्पादन शुल्क यांसह संबंधित विविध विभागांचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाफेडच्या जाचक अटी, शेतकरी हैराण, तांत्रिक अडचणींमुळे संघर्ष संपेना

गणेश मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी परवानग्या मिळविताना अनेक अडचणी येतात. पोलिस, महापालिका, अग्निशमन विभाग अशा वेगवेगळ्या विभागांचे उंबरे झिजवावे लागतात. एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व संबंधित परवानग्या दिल्या जाव्यात अशी आग्रही मागणी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यासह अनेक मागण्यांचा पाऊसच यावेळी पाडण्यात आला. तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता गणेश मंडळे आणि शांतता समितीच्या सदस्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस आयुक्त शिंदे यांनी केले. पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी प्रास्ताविक केले. सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed