नाशिक महापालिकेच्या महासभेत आज पाणी प्रश्नावरुन नगरसेवक चांगलेच आक्रमक झालेले बघायला मिळाले. विशेष म्हणजे एका नगरसेवकाने दुषित पाणी आणले होते. या दुषित पाण्याचा वास पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दाखवण्यात आला. यावेळी संबंधित अधिकाऱ्याने पाणी दूषित असल्याचं मान्य केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जयेश साबळे, नाशिक : नाशिक महापालिकेमध्ये आज पाणी आणि रस्ते या प्रश्नाहून लक्षवेधी मांडण्यात आली. यावेळी अनेक नगरसेवकांनी पाणी पुरवठा, दूषित पाणी पुरवठा तसेच पाण्याच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित करत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सातपूर भागातील नगरसेवक समाधान देवरे यांनी सभागृहात पाणी प्रश्न मांडला. यावेळी त्यांनी आपल्या प्रभागात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत प्रश्न मांडले. एवढेच नव्हे तर देवरे यांनी आपल्यासोबत दोन बॉटल भरून हे पाणी आपल्या समवेत आणले होते. त्यांनी हे पाणी महापौर आणि आयुक्त आणि सभागृहासमोर दाखवत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना या पाण्याचा किमान वास तरी घेऊन दाखवावा, असं आवाहन केलं.
महापौर हिमगौरी आडके यांनी आदेश दिल्यानंतर पाणी पुरवठा अधिकारी रवींद्र धारणकर यांनी या पाण्याचा वास घेत सदर पाण्याची गुणवत्ता खराब असल्याचे कबूल केले. त्यामुळे शहरातील सातपूर भागात नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे देखील स्थानिक नगरसेवक यांनी म्हटले. लवकरात लवकर या प्रश्नाकडे लक्ष देऊन नागरिकांना व्यवस्थित पाणीपुरवठा करून द्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. त्यामुळे येत्या काळात या प्रश्नावर काय मार्ग निघतो? नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ कधी थांबतो? हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.
नगरसेविका प्रियांका माने आक्रमक
दरम्यान, नाशिकची महासभा आज गाजली ती म्हणजे रस्ते आणि पाणी प्रश्नांच्या मुद्द्यावरुन. सिडको, नाशिकरोड विभागातील नगरसेवकांनी आज पाणी प्रश्नाचे गांभीर्य मांडत संबंधित अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना धारेवर धरले. तर सत्ताधारी पक्षातीलच प्रभाग ३ च्या नगरसेविका प्रियांका माने यांनी थेट हंडा डोक्यावर घेऊनच आणि पाणी प्रश्नाचा फलक परिधान करून निषेध म्हणून सभागृहात प्रवेश करत प्रभागतील पाणी प्रश्नाबाबत लक्ष वेधले.
“आमच्या हक्काचे पाणी द्वारकाला चोरी केले जाते, रशासन लक्ष देत नाहीत. वारंवार पत्रव्यवहार केला जाऊन देखील कुठलीही दखल घेतली जात नाही. आमच्या हक्काचे १ कोटी २० लक्ष पाणी सोडले जाते. याचप्रमाणे पंचवटी येथील प्रभाग ३ मध्ये एकदा पण व्यवस्थित पाणी येत नाही. गेल्या ३ वर्षांपासून पाण्याची अडचण आहे”, असा आरोप नगरसेविका प्रियंका माने यांनी केला. प्रियंका माने यांच्यासह अनेक नगरसेवकांनी आपापल्या भागातील पाणी प्रश्नावर रोखठोकपणे भूमिका मांडली.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा