• Mon. Nov 25th, 2024
    कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; सिंधुदुर्ग किल्ल्यापर्यंतची प्रवासी वाहतूक सुरु

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग किल्ल्याचं पर्यटकांना नेहमी आकर्षण असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पाण्यातला किल्ला म्हणून त्याची ओळख आहे. चारही बाजूने समुद्राच्या पाण्याचा वेढा असलेला हा सिंधुदुर्ग किल्ला आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक तसेच शिवप्रेमी मुंबई, पुणे, कोल्हापूर, गुजरात, गोवा, कर्नाटक येथून मोठ्या प्रमाणावर येत असतात. मात्र पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने या किल्यापर्यंत होणारी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी वाहतूक होडी सेवा आता १ सप्टेंबरपासून नव्या पर्यटन हंगामास सुरुवात होत आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे.

    दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.

    Dahihandi 2023: उंच थरावरुन पडून संदेशचा मृत्यू, शिवशंभो गोविंदा पथकाचा मोठा निर्णय, यंदा दहीहंडीला…
    सिंधुदुर्ग किल्याचा महा दरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याची प्रस्ताव पुरातत्त्व विभागा समोर आहे. यानुसार किल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

    VIDEO | एक-दोन नव्हे, पुण्यातल्या रस्त्यावर चार-चार बिबट्यांचं दर्शन; व्हिडिओ पाहून काळजाचा ठोका चुकेल
    १ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने तसेच सागरी हवामानाचा अंदाज घेऊन किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवासी होडी वाहतूक डागडुजी कामानाही वेग आला आहे. मालवणात पर्यटन सफरीवर येणाऱ्या पर्यटकांचे किल्ले सिंधुदुर्ग हे खास आकर्षण आहे. समुद्रातील होडी प्रवास स्मरणीय असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. त्यामुळे सागरी पर्यटनास अर्थात स्कुबा डायव्हीग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स बोटिंग सफर आदी जल पर्यटनाला ही १ सप्टेंबर पासून परवानगी प्राप्त होते. परवानगी व सागरी हवामान याचा अंदाज घेत मालवणचे पर्यटन बहरणार आहे.

    सिंधुदुर्ग किल्ला प्लास्टीकमुक्त करण्यासाठी खास उपक्रम

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed