गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे जुन्या वादातून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत ७ महिन्यांच्या गरोदर महिलेसह ७५ वर्षीय वृद्धाला निर्दयीपणे मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
कुऱ्हाड आणि लाकडी दांड्यांनी हल्ला
राठोड यांनी विचारणा केली असता, आम्ही तुमचा एक माणूस मारला आहे, आता तुला आणि तुझ्या नातवालाही जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी हल्ला चढवला. यावेळी आरोपींनी दगड, लाकडी दांडे आणि कुऱ्हाडीचा वापर करून दामोधर यांना बेदम मारहाण केली.
गरोदर महिलेलाही सोडले नाही
भांडणाचा आवाज ऐकून दामोधर यांची मुलगी शांताबाई, सून यशोदा, नात शिवकन्या आणि नातू निलेश हे सर्वजण भांडण सोडवण्यासाठी धावून आले. मात्र, आरोपींनी त्यांनाही लक्ष्य केले. विशेष म्हणजे, फिर्यादी यांची नात प्रियंका चव्हाण ही सात महिन्यांची गरोदर असतानाही तिला रमेश चव्हाण याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवकन्या चव्हाण हिला मारहाण करून तिचे कपडे फाडून विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
Nagpur Crime : चारित्र्याचा संशय, बाळंतपणानंतर दोन महिन्यांनी पतीचा जीवघेणा हल्ला; नागपूरमधील घटना
पोलीस कारवाई आणि पुढील तपास
या घटनेनंतर दामोधर राठोड यांनी गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेऊन आपबिती सांगितली. त्यांच्या तक्रारीवरून पापा चव्हाण, रमेश चव्हाण, उमेश चव्हाण, पिंटू चव्हाण, अशोक चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, आनसाबाई चव्हाण आणि रोहीदास चव्हाण यांच्यासह एकूण १७ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे प्रकरण परस्परविरोधी असल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूंची दखल घेतली असून, गेवराई पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
