कोल्हापुरात उन्हाचा पारा वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : राज्यात कुठे प्रचंड कडाक्याचं ऊन तर कुठे पाऊस पडताना दिसत आहे. वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेत काही प्रमाणात घट झाली असली तरी आठवड्याभरापूर्वी इथे प्रचंड ऊन पडताना दिसत होतं. कोल्हापूर जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे. दोन-चार दिवस काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी राज्यात पुन्हा कडाक्याचं ऊन बघायला मिळण्याची शक्यता आहे. उन्हाचा पारा वाढल्यामुळे खबरदारीचे उपाय म्हणून कोल्हापुरात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापुरात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोल्हापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
शिक्षणाधिकारी नेमकं काय म्हणाल्या?
“8 सप्टेंबर 2015 चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयानुसार, शाळांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करण्याचे अधिकार त्या त्या शिक्षण अधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना दिले आहेत. सध्या स्थितीत आपण पाहतोय की, अतिशय कडक ऊन आहे. अगदी सकाळी दहा वाजेपासूनच उन्हाचा चटका जाणवायला लागतो. याच पार्श्वभूमीवर मुलांना उष्णतेचे काही विकार किंवा काही आरोग्यविषय समस्या जाणवू नयेत हा विचार करुन सकाळी शाळा भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली.”सकाळी शाळेची वेळ ही 7.20 ते 11.30 अशी असणार आहे. शिक्षकांनी पूर्वतयारीसाठी 7 वाजता उपस्थित राहायचं आहे. जास्त ऊन असल्याने विद्यार्थ्यांना डिहायड्रेशन होणं, चक्कर येणं, भोवळ येणं किंवा त्यांना त्वचेविषयी समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. असं होऊ नये म्हणून सकाळच्या वेळेत लवकर शाळा भरवणं हे विद्यार्थ्यांना नक्कीच शैक्षणिकदृष्ट्या फायद्याचं ठरेल”, असं शिक्षणाधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या.
सांगलीत वादळी वाऱ्यासह गारपीट
दरम्यान, सांगलीच्या मिरज येथे आज अचानक पाऊस पडला आहे. मिरज पूर्वेत वादळी वाऱ्यासह गारपीट पडली आहे. सांगली जिल्ह्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.
चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.
चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.
खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा