• Mon. Nov 25th, 2024

    दोन दुचाकीच्या अपघातानंतर बाचाबाची; वाद मिटला तेव्हढ्यात घडली मोठी दुर्घटना, ३ ठार, १ गंभीर जखमी

    दोन दुचाकीच्या अपघातानंतर बाचाबाची; वाद मिटला तेव्हढ्यात घडली मोठी दुर्घटना, ३ ठार, १ गंभीर जखमी

    बुलडाणा: मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखाली व घाटावरील भागांमध्ये दूचाकी अपघाताचे सत्र थांबता थांबेना असे चित्र आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी देखील एक मोठी दुर्घटना घडली. दोन दुचाकीचा किरकोळ अपघात झाल्यानंतर त्यांच्या बाचाबाची सुरू नेमके तेव्हाच बाळापुरकडून शेगावकडे जाणाऱ्या मालवाहू वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने ते वाहन उभे असलेल्या दोन्ही दुचाकींना चिरडत बाजूला उलटले. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी झालेल्या या अपघातात दोन्ही साडूभाऊ जागीच ठार झाले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शेगाव मार्गावरील नगर परिषदेच्या कचरा डेपो जवळ बुधवार झाला. मालवाहू वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला.

    डोंगरगाव तालुका बाळापूर जिल्हा अकोला येथील प्रवीण रमेश नेमाडे (वय ४५) ते शेगावच्या संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी करतात. ते व त्यांचे साडूभाऊ प्रमोद श्रीधर चोपडे (वय ५०) राहणार अकोली तालुका संग्रामपूर, हे दोघे दुचाकीने शेगाव येथून बाळापुरला येत होते. दरम्यान समोरून येणाऱ्या ज्ञानेश्वर गजानन रोही (वय २६) राहणार येवता तालुका रिसोड जिल्हा वाशिम आणि राहुल मधुकर रोही (वय २२) यांच्या दुचाकीला समोर किरकोळ धडक झाली. त्यानंतर त्यांची थोडी बाचाबाची झाली व दोघांनी समजूतदारपणा दाखविला त्यानंतर घटनास्थळावरून ते निघण्यासाठी दुचाकीवर बसले तेवढ्यातच बाळापुर करून शेगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चार चाकी मालवाहू वाहनाने असलेल्या उभ्या दोन्हीही दुचाकीला धडक दिली व दोन्हीही दुचाकीवरून वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल खड्ड्यात जाऊन उलटले.

    चिमुकल्याचे पितृछत्र हरविले

    प्रवीण नेमाडे यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या दोन चिमुकल्यांचे पितृछत्र हरपले आहे. नेमाडे हे श्री संत गजानन महाराज इंजीनियरिंग कॉलेज शेगाव येथे नोकरीवर कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता डोंगरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील आई ,पत्नी एक मुलगा, एक मुलगी परिवार आहे.

    या विचित्र अपघातात प्रवीण नेमाडे व प्रमुख चोपडे हे दोघेही साठ भाऊ जागीच ठार झाले तर ज्ञानेश्वर झाले घटना घडतात ठाणेदार अनिल जुमळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा घटनास्थळावर जाऊन जख्मी व्यक्तींना तातडीने अकोला येथे पाठवले. तर दोन्ही मृतांच्या कुटुंबाला घटनेची माहिती दिली. मात्र जखमी ज्ञानेश्वर रोही यांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांनी फरार मालवाहू वाहनाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed