• Sat. Sep 21st, 2024

प्रेयसीच्या कुटुंबाचा प्रेमाला विरोध; प्रियकराचा टोकाचा निर्णय, लोकल रेल्वे सिग्नलवर आयुष्य संपवलं

प्रेयसीच्या कुटुंबाचा प्रेमाला विरोध; प्रियकराचा टोकाचा निर्णय, लोकल रेल्वे सिग्नलवर आयुष्य संपवलं

कल्याण: कसारा रेल्वेमार्गावरील शहाड स्टेशनजवळ असलेल्या लोको शेड परिसरात रेल्वे सिग्नलला गळफास घेतलेल्या स्थितीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. ज्या मुलीशी त्याचे प्रेम होते तिच्या घरच्यांकडून विरोध झाल्यामुळे व्यथित झालेल्या या तरूणाने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विकास काटे असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे एका तरूणीशी प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, मुलीच्या कुटुंबियांनी प्रेमसंबंधास विरोध केल्याने विकास तणावात होता. प्रेमसंबंधास विरोध असल्याने विकास याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

महिलेच्या पतीने मारलं, रेल्वेखाली जीव गेला; दिनेश राठोडची बहीण म्हणतेय तिघांना पण फाशी द्या

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणजवळ असलेल्या रेल्वेच्या लोको शेड परिसरात रेल्वेच्या सिग्नला एका तरुणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आल्याची माहिती मंगळवारी रात्री कल्याण लोहमार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सिग्नलला लटकलेला मृतदेह खाली उतरवला. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलला पाठवून दिला.

पोलिसांनी केलेल्या तपासात मृत विकास हा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातला रहिवासी आहे. तो गेल्या सहा दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. घरच्यांनी स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, विकास याचे एका तरूणीशी प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र तरूणीच्या घराच्या मंडळींचा त्याला विरोध होता. त्यामुळे तो मानसिकदृष्टया खचला होता. त्यातून त्याने आपले जीवन संपुष्टात आणल्याचे सांगण्यात आले. सध्या हे प्रकरण येवला पोलिस ठाण्यास वर्ग केले जाणार आहे. स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करणार आहेत.

लेकीचा हनीट्रॅपशी संबंध नाही, बॉडी नदीत फेकल्याबाबत पप्पूकडून दिशाभूल, सना खानच्या आईचा दावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed