• Mon. Nov 25th, 2024

    जळगावात गोमांस वाहतूक संशयावरुन ट्रक पेटविला; पोलिसांवरही दगडफेक, काय घडलं?

    जळगावात गोमांस वाहतूक संशयावरुन ट्रक पेटविला; पोलिसांवरही दगडफेक, काय घडलं?

    Jalgaon News : जळगावात गोमांस वाहतूक संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना घडली. बिथरलेल्या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात दोन पोलिस जखमी झाले. काय घडलं?

     

    जळगावात गोमांस वाहतूक संशयावरुन ट्रक पेटविला
    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गावर पाळधी (ता. धरणगाव) बायपासजवळील गोदाम परिसरात गोमांसची वाहतूक करत असल्याच्या संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना गुरुवारी (दि.१७) रात्री घडली. या घटनेमुळे रस्त्यावर मोठा जमाव आल्याने पाळधी गावासह परिसरात रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता.

    बांभोरी एसएसबीटी कॉलेजजवळ पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास एक ट्रक थांबला होता. त्यातून मांसाची दुर्गंधी येत असल्याने तेथे उपस्थित तरुणांना संशय आला. त्यांनी ट्रकचालकाची चौकशी सुरू केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तरुणांसह पेट्रोलपंपावरील कर्मचाऱ्यांनी पाळधी दूरक्षेत्रला फोन करून माहिती दिली. दूरक्षेत्र चौकीतील एक पोलिस कर्मचारी पंपावर आला. त्याने चौकशी केली. त्यानंतर हा ट्रक पाळधी दूरक्षेत्राला जमा न करता बायपासच्या दिशेने पुढे जात असल्याने पोलिस कर्मचाऱ्याने ट्रक सोडून दिल्याचा संशय पाठीमागून येणाऱ्या तरुणांचा झाला. त्यामुळे त्यांनी ट्रक अडवला.
    धक्कादायक! चालत्या ट्रकमधून महिलेला फेकले रस्त्यावर; ड्रायव्हर म्हणतो ती खाली उतरेनाच, काय घडलं?
    घटनास्थळी मोठा जमाव चालून आला. यावेळी संतप्त जमावातील तरुणांनी ट्रकचालकास खाली उतरवून मारहाण करीत ट्रक पेटवून दिला. यावेळी पोलिस व तरुणांमध्ये वाद झाला. जमाव ऐकत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे बिथरलेल्या तरुणांनी पोलिसांवर दगडफेक केली. यात दोन पोलिस जखमी झाले.

    टीम मटा ऑनलाइन यांच्याविषयी

    Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed